म. टा. प्रतिनिधी, मुंबई: 'झी स्टुडिओज' आणि नागराज मंजुळे यांच्या आगामी 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या शीर्षकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे; त्याचबरोबर अनेकांचं लक्ष वेधलंय ते या चित्रपटाची नायिका सायली पाटीलनं. या चित्रपटातल्या 'गुन गुन' या गाण्यातली आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यातली रोमँटिक केमिस्ट्री बघून तरुणाई त्यांच्या प्रेमात पडली आहे. विशेषतः या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणाऱ्या सायली पाटीलची 'गुन गुन गर्ल' अशी नवी ओळख निर्माण झाली असून ती महाराष्ट्रातल्या तरुणाईचा नवा क्रश बनली आहे.
रिंकूमुळे हुकलेली सायलीची संधी
सायलीबाबत विशेष गोष्ट ‘सैराट’मधल्या आर्चीच्या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी सायलीला शॉर्टलिस्ट केलं होतं; परंतु पुढं त्या भूमिकेसाठी रिंकूची निवड झाली. सायलीची ती संधी तेव्हा हुकली असली, तरी आता 'घर बंदूक बिरयानी'मधून ती नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. याच चित्रपटातल्या 'गुन गुन' या गाण्याला यू-ट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. आकाश ठोसर आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यामध्ये पाहायला मिळते आहे. हजारो प्रेक्षकांनी कमेंट करत गाण्याचे तर कौतुक केलेच, पण त्याबरोबरच सायली आणि आकाशची रिफ्रेशिंग जोडी आवडल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
'गुन गुन गर्ल' अशी मिळाली नवी ओळख
दरम्यान या गाण्याला मिळत असणाऱ्या प्रतिसादाबद्दल सायली म्हणाली, 'प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मला थक्क करणारा आहे. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत आहे. प्रेक्षक 'गुन गुन' या गाण्यावर आणि माझ्यावर भरभरून प्रेम करीत आहेत. मी कुठंही गेले, तरी तिथं माझी ओळख 'गुन गुन गर्ल' अशीच होत आहे. ही फिलिंग खूप सुखावणारी आहे. यासाठी मी झी स्टुडिओज, नागराज मंजुळे आणि दिग्दर्शक हेमंत अवताडे यांचे विशेष आभार व्यक्त करते.'
‘झी स्टुडिओज’ आणि ‘आटपाट प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटात आकाश आणि सायलीसोबतच सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे एका हट के भूमिकेत बघायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.