अ‍ॅपशहर

पोहायला गेलेली अभिनेत्री झाली बेपत्ता, होडीत एकटा सापडला चार वर्षांचा मुलगा

हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरा (Naya Rivera) तिच्या चार वर्षांच्या मुलासोबत स्विमिंगसाठी गेली होती. होडीत मुलाला ठेवून तिने पाण्यात उडी मारली. पण ती वर आली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2020, 4:05 pm
मुंबई- हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेराबाबतीत (Naya Rivera) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, Glee फेम अभिनेत्री कॅलिफोर्नियातील पीरू या लेककडून बेपत्ता झाली आहे. तुर्तास ती तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना बुधवारी तिची होडी लेक काठी मिळाली होती. यात तिचा चार वर्षांचा मुलगा झोपला होता. त्याने पोलिसांना सांगितलं की, नाया रिवेराने पाण्यात उडी मारली होती. पण ती वर परत आली नाही. सध्या तिला शोधण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पोहायला गेलेली अभिनेत्री झाली बेपत्ता, होडीत एकटा सापडला चार वर्षांचा मुलगा


View this post on Instagram just the two of us A post shared by Naya Rivera (@nayarivera) on Jul 7, 2020 at 3:15pm PDT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पीरू लेककडून एक फोन आला होता. एका महिला आणि तिच्या मुलाने तीन तासांसाठी होडी भाड्याने घेतली होती. पण तीन तास उलटून गेल्यावरही ते परत आले नाही. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. नाया रिवेराला तिच्या Glee या टीव्ही सीरिजसाठी ओळखले जात. २००९ ते २०१५ या काळात ही सीरिज सुरू होती.


View this post on Instagram Always bringing the 🌞 A post shared by Naya Rivera (@nayarivera) on Mar 11, 2020 at 1:02pm PDT

नायाने ७ जुलै रोजी मुलासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात ती आपल्या मुलासोबत दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले होते की, 'फक्त आम्ही दोघं..' नाया रिवेरा ३३ वर्षांची आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज