मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद (Hrithik Roshan and Saba Azad to tie knot?) गेल्या अनेक महिन्यांपासून डेट करत आहेत. ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र देखील दिसले आहे. बॉलिवूडच्या विविध पार्टीजमध्ये देखील या कपलने एकत्र हजेरी लावली होती. आता काही मीडिया रिपोर्टनुसार हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे वाचा-बेबी बंप लपवताना दिसली ऐश्वर्या? Video मुळे पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीची चर्चा
हृतिक-सबा बॉलिवूडच्या सध्या 'हॉटेस्ट कपल'पैकी एक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांचे परदेशात सुट्टी एंजॉय करताना फोटो व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची विशेष चर्चा असते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी हृतिकचा Sussanne Khan हिच्याशी घटस्फोट झाला, त्यांचं १४ वर्षांच्या नातं संपल्याने अनेकांना धक्का बसला होता. आता हृतिक त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सबा आझादला डेट करतो आहे.
हे वाचा-कतरिना कैफच्या 'वहिनी'चा बोल्ड अंदाज, बिकिनी फोटो शेअर करत म्हणाली...
सबा-हृतिकच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सच्या मते लवकरच हा लग्नसोहळा पार पडू शकतो. याशिवाय फिल्मफेअरने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर याविषयी पोस्ट केली आहे, त्यामुळे हृतिक-सबाचे चाहते या लग्नासाठी उत्सुक आहेत.
एकत्र स्पॉट झाल्यानंतर सुरू झाली होती रिलेशनशिपची चर्चा
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर हृतिक आणि सबा एकत्र दिसले होते. तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर हे कपल करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये हातात हात घालून पोज देताना दिसले. यावेळी त्यांचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळाला. सबा अनेकदा रोशन कुटुंबीयांसह देखील स्पॉट झाली आहे. सोशल मीडियावर सबाचे रोशन कुटुंबीयांसह काही फोटोही व्हायरल झालेत.