अ‍ॅपशहर

भाग्यश्री मोटेचा त्या महिलेवर संशय, बहिणीचा मृत्यू झाला त्या दिवशी ती...पोस्ट शेअर करत सगळंच सांगितलं

Bhagyashree Mote sister news: मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची बहीण मधू संकेत मार्कंडेय हिच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात तिच्या पतीचंही निधन झालं आहे. त्यामुळं या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2023, 9:27 am
पुणे: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतीलअभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. तिचा मृत्यू नैसर्गित नसल्याचं भाग्यश्रीचं म्हणणं आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलंय, हे समोर यायला हवं, अशी मागणी तिनं केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi actress Bhagyashree Mote


भाग्यश्री मोटे हिची बहीण मधू संकेत मार्कंडेय अचानक चक्कर पडली होती. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. पण खासगी रुग्णालयानं सरकारी रुग्णालयात पाठवलं. सरकारी रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं होतं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या होत्या.मधू संकेत मार्कंडेय हिचा मृत्यू झाल्याची घटना काळेवाडी इथं रविवारी (१२ मार्च) दुपारी घडली होती. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर भाग्यश्री मोटे आणि तिच्या नातेवाइकांनी या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे.
मधू संकेत मार्कंडेय हिचं वय ३२ वर्षे होतं. ती रहाटणी इथं राहत होती. मधू हिच्या पतीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. पतीच्या झालेल्या निधनानंतर ती त्यांच्या वडिलांकडं राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

काय घडलं नेमकं?
मधू दुपारी बाराच्या सुमारास मैत्रिणीसोबत काळेवाडी परिसरात खोली पाहण्यासाठी गेल्या होत्या. खोली पाहत असतानाच मधूला चक्कर आली. तिला रुग्णालयात दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

पण बहिणीच्या मृत्यूला इतके दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, असं भाग्यश्रीचं म्हणणं आहे. तिनं आता एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
मी जाऊ तरी कुठं? आता काहीच उरलं नाहीये...संजनाचे शब्द ऐकून अनघाही रडली
काय आहे भाग्यश्रीची पोस्ट?
हेलो. हे कोणाला धमकवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी नाहीये. फक्त खरं काय ते सांगतेय. १२ मार्च २०२३ रोजी रविवारी दुपारी दोन वाजता माझी बहीण बेक केलेले केक बेस घेऊन केक वर्कशॉप घेण्यासाठी बाहेर पडली होती. तिच्यासोबत एक महिला होती , ३-४ महिन्यांपूर्वी तिची ओळख झाली होती. आम्हाला माहिती आहे त्यानुसार ती पाच महिलांना घेऊन केक वर्कशॉप घेणार होती.


View this post on Instagram A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

आता ती महिला सांगत आहे की, त्या दोघी सहज रुम बघायला बाहेर पडल्या होत्या. त्यांना एका जागेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्या जागेच्या मालकाला कॉल केला. आणि त्या दोघीं तिथं गेल्या. तिथं गेल्यानंतर अर्धा तास त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर माझ्या बहिणीला अचानक चक्कर आली आणि ती कोसळली. तिला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. पण तिथं त्यांना संशयास्पद वाटलं त्यामुळं त्यांनी तिला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितलं. त्यानंतर तिला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिचा एका तासापूर्वीच मृत झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
बहिणीच्या संशयास्पद मत्यूनंतर भाग्यश्री मोटेची तीन शब्दांची 'ती' पोस्ट, चर्चेला उधाण

यावरून स्पष्ट पुरावे आहेत की,माझी बहीण ठरल्याप्रमाणं केक वर्कशॉप घेण्यासाठी निघाली होती. तिला त्याचा अॅडव्हान्सही मिळाला होता. तिच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे सगळं झालं खूप संशयास्पद आहे. माझी बहीण ज्या ठिकाणी गेली, ती जागा कमी गर्दीची जागा होती. तिथं सीसीटीव्ही नव्हते. माझ्या बहिणीनं घर आणि एक ऑफिस भाड्यानं घेतलं होतं. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ती वर्कशॉप घेत होती.



मला हेच समजत नाहीये की, इतक्या दिवसांनंतरही कोणतीही कारवाई का करण्यात आली नोहीये. अनेक स्पष्ट पुरावे आहेत. काही तरी चुकीची माहिती पसरवली जात आहे. मला पाठपुरावा करतेय, पण मला कुणीही उत्तर देत नाहीये.माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवा, असं भाग्यश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज