मुंबई: अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' मध्ये त्याच्या लेकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बेबी बम्प फ्लाँट करणारा एक फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा नवरा अभिनेता वत्सल शेठही या फोटोमध्ये आहे. या दोघांनी ट्विनिंग करत सोशल मीडियावर हे खास प्रेग्नन्सी फोटोशूट शेअर केले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोनंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. इशिताने इन्स्टाग्रामवर तिचे काही प्रेग्नन्सी फोटोशूटमधील फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली. चाहत्यांसह सिनेविश्वातील सेलिब्रिटींनी इशिता आणि वत्सल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्याने शेअर केलेले बीचवरील फोटो खूपच सुंदर आहेत. एका फोटोमध्ये वत्सल त्याच्या पत्नीच्या बेबी बम्पला किस करताना दिसतो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसले. इशिताने हे फोटो शेअर करताना 'Baby on Board' असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केलेत. इशिता आणि वत्सल यांनी शेअर केलेल्या फोटोत, इशिताने फ्लोरल ड्रेस परिधान केला असून वत्सलनेही त्याच प्रिंटचा शर्ट परिधान केला आहे. सोशल मीडियावर कपलचा हा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान इशिता आणि वत्सल यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता पाच वर्षांनी पहिल्यांदाच या जोडप्याने आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली.
इशिता आणि वत्सल आई-वडील होण्यासाठी उत्सुक आहेत. बॉम्बे टाइम्सशी बोलताना त्यांनी हा त्यांच्या नवीन आयुष्यातील नवीन टप्पा कसा आहे याबाबत भाष्य केले. इशिता म्हणाली की, 'आम्ही खूप उत्साही आहोत आणि पूर्णपणे तयार असे नाही आहोत, पण आम्ही याची वाट नक्की पाहत आहोत. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो. शरीर एका वेगळ्याच अनुभवातून जात आहे.'
तर वत्सल म्हणाला की, 'आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत, पण करिअरमध्ये स्थिरावल्यानंतरच मुलाबाबत विचार करायचा असा निर्णय आम्ही घेतला नव्हता. लग्न हा जसा मैलाचा दगड असतो, तसाच मूल होणे हा आणखी एक मैलाचा दगड असतो. काम होत राहते आणि तुम्ही कठोर परिश्रमही करत राहाल, पण आमच्या बाळाचे स्वागत करणे ही नक्कीच आमच्या आयुष्यातील एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात असेल.'