अ‍ॅपशहर

ज्या घरात अंबर हर्डने मोडलेलं जॉनी डेपचं बोट, आता विकला जातोय तो महाल किंमत तर एकदा वाचाच

Johnny Depp Australia House- जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणात या दोघांमध्ये हाणामारी झाल्याची बरीच चर्चा झाली होती. जॉनी आणि अंबरने एकमेकांवर अनेक आरोप केले.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2022, 9:04 am
मुंबई- हॉलिवूड स्टार जॉनी डेप गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांऐवजी त्याची पूर्वाश्रमिची पत्नी अंबर हर्डविरुद्ध करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यामुळे चर्चेत आहे. जॉनी आणि अंबरचे हे प्रकरण चर्चेत होते कारण त्याच्या सुनावणीदरम्यान दोघांनीही एकमेकांवर अनेक खळबळजनक आरोप केले होते ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. आता जॉनी डेप ज्या घरात अंबरने त्याला मारले आणि त्याचे बोट मोडले ते घर विकत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Johnny Depp


कमाई करावी तर 'ब्रह्मास्त्र'सारखी, दुसऱ्या दिवशीचा आकडा वाचण्यापूर्वी स्वतःला सावरा

जॉनी आणि अंबरमध्ये झालेलं भांडण

फेब्रुवारी २०१५ मध्ये लग्न झाल्यानंतर मार्च महिन्यात जॉनी आणि अंबर याच घरात राहत होते. त्यानंतर जॉनी त्याच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' सीरिजच्या पुढच्या भागाचं शूटिंग करत होता. या प्रकरणादरम्यान जॉनीने सांगितले होते की, ऑस्ट्रेलियातील घरात त्याचं अंबरसोबत भांडण झालं होतं. याच घरात जॉनीसोबत हिंसक भांडण झाल्याची कबुलीही अंबरने दिली होती. जॉनीने सुनावणीदरम्यान दावा केला की, अंबरने त्याच्यावर हल्ला केल्यामुळे त्याच घरात त्याच्या बोटाचा पुढचा भाग कापला गेला.

दोघांनी एकमेकांवर केले अनेक आरोप

मात्र, याला उत्तर देताना अंबरने वेगळेच वक्तव्य करत जॉनीवर खळबळजनक आरोप केले होते. अंबरने सांगितलं होतं की जॉनीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिच्या गुप्तांगात दारुची बाटली घातली. जॉनी हा ड्रग अॅडिक्ट होता आणि त्यामुळेच तो असे वागला, असा आरोपही अंबरने यावेळी केला होता. ऑस्ट्रेलियातील हे घर सोडल्यानंतरच दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.

अजिंक्य राऊतवर कोसळला दुःखाचा डोंगर, तरीही हसऱ्या चेहऱ्यानं चाहत्यांना गेला सामोरा

काहीसा असा आहे राजमहल

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या या घराची किंमत ४० मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्याचा लिलाव आता २८ सप्टेंबरला होणार आहे. या घरात १० लक्झरी बेडरुम, १० बाथरूम व्यतिरिक्त बरीच मोकळी जागा आहे. १८ हेक्टरमध्ये पसरलेली ही मालमत्ता आहे. खाजगी विमानांना उतरण्यासाठी हेलिपॅड आणि लँडिंग स्ट्रिपदेखील आहे. नदीवर फिरण्यासाठी एक खाजगी जेट्टी देखील आहे आणि अशी एक बोट आहे ज्यामध्ये २ हजार वाईनच्या बाटल्या आणि स्वतःचे खाजगी थिएटर आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख