अ‍ॅपशहर

या सेलिब्रिटींशी आहे करिना कपूरचा ३६ चा आकडा, चेहराही पाहायला आवडत नाही

करिना कपूर खान आज ४२ वर्षांची झाली आहे. या यादीत त्या सेलिब्रिटींची नावे आहेत, ज्यांच्यापासून करिना कपूर खानने सुरू केलेलं शीतयुद्ध आजतागायत सुरू आहे. यात जी नावं आहेत ती वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2022, 10:01 am
मुंबई- बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर खान आज २१ सप्टेंबर रोजी तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने 'रिफ्युजी' या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, पण सिनेसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला. करिनाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kareena Kapoor


एवढंच नाही तर तिने सिनेसृष्टीतील सर्व टॉपच्या कलाकारांसोबत काम केले. आता बॉलिवूडमध्ये एकीकडे बेबोची अनेकांसोबत मैत्री असेल तर तिला न आवडणारे लोकही असतीलच. करिनाचे अनेक सेलिब्रिटींसोबत मतभेदही झाले होते. या लिस्टमध्ये आज आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यापासून करिना कपूर खानचा ३६ चा आकडा आहे.

अमिषा पटेल

फार कमी लोकांना माहीत असेल की, 'कहो ना प्यार है' हा चित्रपट अमिषा पटेलच्याआधी करिना कपूर खानला ऑफर झाला होता. त्याचवेळी करिनाने 'रिफ्युजी'ची निवड केली होती. त्यांच्या पहिल्या चित्रपटांपैकी करिनाचा चित्रपट फ्लॉप झाला आणि बेबोने अमिषाला वाईट अभिनेत्री म्हटले होते.

बिपाशा बासू

बिपाशा बासूने अक्षय कुमारच्या अजनबी या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये भांडण झाल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर करिनाने बिपाशाला 'ब्लॅक कॅट' देखील म्हटलं होतं.

बॉबी देओल

'जब वी मेट' चित्रपटासाठी करिना कपूर खान आणि बॉबी देओल दिग्दर्शकांची पहिली पसंती होती. असे म्हटले जाते की या चित्रपटात बॉबीला मुख्य नायक म्हणून पाहण्याची करिनाची इच्छा नव्हती, या घटनेनंतर दोघांमध्ये शीत युद्ध सुरू झालं जे आजपर्यंत सुरू आहे.

दीपिका पादुकोण

करिना कपूर आणि दीपिका पदुकोण या दोघीही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघींमध्ये जोरदार स्पर्धा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघींमध्ये खूप स्पर्धा होते आणि या स्पर्धेमुळे दोघी नेहमी अंतर राखून राहतात.

दिया मिर्झा

दिया मिर्झा अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. एकदा दियाने करिना कपूर खानच्या ड्रेसवर कमेंट केली होती. यानंतर करिना चांगलीच भडकली. दोघीमधील शीतयुद्ध आजतागायत सुरू आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज