अ‍ॅपशहर

VIDEO: बॉयकॉटचा धसका म्हणायचा का? करिनाचं असं वागणं चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिलं

Kareena kapoor airport video करिना कपूर खान हिला चाहत्यांशी कसं वागावं कळत नाही, असं अनेकदा बोललं गेलं आहे. काही फॅन्सनी करिनाच्या भेटीचा अनुभवही शेअर केला आहे. तो फार काही चांगला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र आता करिना याबाबतीत बदलली आहे. तिचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 5:41 pm
मुंबई: अभिनेत्री करिना कपूर खान सध्या अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. करिनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. करिना चाहत्यांना भाव देत नाही, तिला चाहत्यांची किंमत नाही अशा आशयाच्या पोस्ट , फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. पण सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मात्र करिनात झालेला बदल दिसून येतोय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kareena kapoor  video


करिनाचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिचा अभिनय असो किंवा मग तिची स्टाइल... चाहत्यांमध्ये तिची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. करिनाची एखादी झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत असते. परंतू अनेकदा करिनाला मात्र या सर्व गोष्टी खटकतात. चाहत्यांसोबत कठोर वागताना दिसते. इतकंच नाही तर फोटोग्राफर्संनाही ती पोज न देताच निघून जाते. असं असलं तरी करिना आता बदलली आहे, असा प्रश्न आता चाहत्यांना पडतोय, त्याचं कारण म्हणजे तिचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ.
रिक्षाचालकाची मुलगी गाजवणार बिग बॉस १६, फेमिना मिस इंडियामध्ये जिंकलेलं उपविजेतेपद
करिनाला नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. करिना तिच्या कारमधून उतरताच तिच्या भोवती चाहत्यांनी गर्दी केली. फोटो, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ दिसून आली. धक्काबुक्कीही झाली. एकानं तर करिनाची बॅग ओढण्याचाही प्रयत्न केला. इतकं सगळं होत असताना करिना मात्र चिडली नाही, की संतापली नाही, तिनं एक दोन चाहत्यांना हसत हसत सेल्फीसाठी पोज दिल्या. चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत ती एअपोर्टच्या आत गेली. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

नेहमीच चाहत्यांवर चिडणारी, खेकसणारी, त्यांना भाव न देणारी बेबो यावेळी मात्र संयमानं वागताना दिसली. त्यामुळं चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे


View this post on Instagram A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


आदिपुरुषचा टीझर पाहून प्रेक्षकांची झाली घोर निराशा, सोशल मीडियावर चहूबाजूंनी होतेय टीका
बॉयकॉटमुळे झाला बदल?

गेल्या काही महिन्यात बॉलिवूड कलाकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. एखादी संधीच हवी असते की, एखाद्या कलाकाराविरोधात बॉयकॉट सुरू होतो. त्यामुळं बॉलिवूड कलाकार सध्या मोजून मापून बोलताना दिसतात. तर सार्वजनीक ठिकाणी वावरताना कोणतीही चूक होणार नाही, याकडंही लक्ष देतात. करिनामध्ये दिसून आलेला बदल यामुळंच झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख