अ‍ॅपशहर

स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो

करिना कपूर खान आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. लोक सोशल मीडियावर तिचं अभिनंदन करत आहेत. काल २३ फेब्रुवारी रोजी ती इस्पितळातून घरी आली. आता तिचे घरातले फोटो व्हायरल होत आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2021, 12:15 pm

हायलाइट्स:

  • हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूर
  • दुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक
  • २१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्म
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम करिना कपूर
मुंबई- करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा झाला. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी करिना आणि सैफला शुभेच्छा दिल्या. आता प्रत्येकजण करिना आणि सैफच्या नवजात बाळाचे फोटो पाहण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, काल २३ फेब्रुवारी रोजी करिनाला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असून ती घरीही परतली. आता तिचे घरी आराम करतानाचे नवीन फोटो समोर येत आहेत.
करिना तिच्या घरी बाल्कनीत आराम करताना दिसली. तिने २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आदल्या दिवशी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास करिनाला मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मुलाच्या जन्मानंतर जवळपास दोन दिवसांनी तिला घरी सोडण्यात आलं.

दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले सैफ- करिना, तैमुरही होता सोबत

काल मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून काही फोटो समोर आले होते, यात सैफ आणि करिना गाडीत बसून घरी जाताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये तैमूर सैफच्या मांडीवर बसलेला दिसत होता. यापूर्वी कुटुंबातील बरेच सदस्य आणि जवळचे मित्र करिना कपूरला पाहण्यासाठी इस्पितळात गेले होते.

लॉकडाउनमध्ये करिनाने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. करिना आणि सैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'आमच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप आभार.'


कसा दिसतो सैफ- करिनाचा छोटा मुलगा? आजोबा रणधीर कपूर यांनी सांगितलं

या प्रोजेक्टमध्ये दिसणार सैफ अली खान आणि करिना कपूर

सैफ अली खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच 'तांडव' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यानंतर तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. यासोबतच अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत तो 'भूत पोलिस' मध्येही दिसणार आहे. तर करिना कपूरने आमिर खानसोबतचा आगामी 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज