अ‍ॅपशहर

बाळासाहेबांनी डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दिलेली खास भेट, डॉ. लहानेंनी सांगितली अमूल्य आठवण

कोण होणार करोडपती कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी डॉ. तात्याराव लहाने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हृदय आठवण सर्वांना सांगितली. ती ऐकून सर्वजण भावुक झाले होते.

guest Amita-Bade | Lipi 22 Jul 2022, 4:33 pm

हायलाइट्स:

  • डॉक्टर लहाने यांनी सांगितला बाळासाहेबांची आठवण
  • बाळासाहेबांच्या डोळ्यांचं लहाने यांनी केलं होत ऑपरेशन
  • ऑपरेशननंतर बाळासाहेबांनी डॉक्टरांनी दिली अमूल्य भेट
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम डॉ. तात्याराव लहाने
मुंबई : कोण होणार करोडपती कार्यक्रमात नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक हृदय आठवण सांगितली. ती ऐकून सर्वजण भावुक झाले होते.
काय म्हणाले डॉ. लहाने

कोण होणार करोडपती कार्यक्रमात सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी डॉक्टर तात्याराव लहाने यांना काही आठवणी सांगण्याची विनंती केली. त्यावेळी डॉक्टरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितलं की, 'बाळासाहेबांची दृष्टी दिवसागणिक क्षीण होत चालली होती. त्यावेळी त्यांनी मला डोळे तपासायला बोलावले. पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना तपासायला गेलो तेव्हा खूपच नर्व्हस झालो होतो. परंतु नंतर मी स्वतःला सावरलं. बाळासाहेब देखील माझे इतर पेशंटप्रमाणेच आहेत, असं स्वतःला समजावलं. त्यांना काय त्रास होतोय ते विचारलं. बाळासाहेबांनी मला सांगितलं की, त्यांना वृत्तपत्र वाचायला त्रास होत होता. त्यानंतर मी त्यांचे डोळे तपासले आणि लेझर ट्रीटमेंट करण्याचं ठरवलं.'

लंडनच्या रस्त्यावर प्रवीण तरडेंचा रोमान्स बहरला! Video मध्ये झाले शूट प्रेमाचे क्षण

View this post on Instagram A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

बाळासाहेबांनी दिली अमूल्य भेट

डॉक्टर लहाने यांनी पुढं सांगितलं की, 'बाळासाहेबांवर लेझर ट्रीमेंट केली. त्या ट्रीटमेंटनेंतर पुन्हा बाळासाहेबांचे डोळे तपासले. ते एकदम ठणठणीत बरे झाले होते. त्यानंतर त्यांनी मला वृत्तपत्र द्यायला सांगितलं. त्यांनी मला वृत्तपत्र व्यवस्थित वाचून दाखवलं. ते फार आनंदी झाले साहेबांनी लगेच एका फोटोग्राफरला बोलावलं आणि माझ्याबरोबर त्यांनी एक फोटो काढला. काही दिवसांनी तो फोटो त्यांनी स्वाक्षरी करून मला आठवण म्हणून पाठवला. ती आतापर्यंत माझ्यासाठी सर्वात अमूल्य भेट आहे.' हे सांगताना डॉ. तात्याराव लहाने भावुक झाले होते. डॉ. तात्याराव लहाने यांनी १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.

View this post on Instagram A post shared by Sony मराठी (@sonymarathi)
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख