अ‍ॅपशहर

Video- 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमादरम्यानच नानांनी सचिन खेडेकरांकडे मागितला कोट

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम अनेक प्रेक्षक आवर्जुन पाहतात. लवकरच या कार्यक्रमात कर्मवीर विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. यावेळी या खास भागासाठी पद्मश्री नाना पाटेकर पाहुणे म्हणून येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2021, 1:39 pm
मुंबई- 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. 'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या भागात पद्मश्री अभिनेते 'नाना पाटेकर' कर्मवीर म्हणून येणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kon honar karodpati karmavir special nana patekar sony marathi
Video- 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमादरम्यानच नानांनी सचिन खेडेकरांकडे मागितला कोट



नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.


कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन समाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज