अ‍ॅपशहर

छोट्या ड्रेसमध्ये बोल्ड क्रिती सेनॉन, लाखांच्या जवळपास आहे बॅगची किंमत

जेव्हा क्रिती सेनॉनला जुहूमध्ये पाहण्यात आले तेव्हा तिचा अंदाज काही वेगळाच होता. यावेळी तिच्या लुकमध्ये कमतरता शोधणे अशक्य होते. पण तरीही काहींनी क्रितीला सोशल मीडियावर ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2021, 11:14 am
मुंबई- काहींवर देवाचा वरदहस्त असतो असं आपण नेहमीच ऐकतो. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही त्यातलीच एक आहे. क्रिती सेनॉनला आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. परमेश्वराच्या कृपेने पहिल्यापासूनच तिची फिट फिगर आहे. याशिवाय तिची उंचीही इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे. उंची आणि फिगर या दोन्ही गोष्टी क्रितीसाठी जमेची बाजू आहे. याचमुळे जेव्हाही क्रिती कपड्यांमध्ये काही वेगळं ट्राय करते तेव्हा ती उतरांपेक्षा उजवी दिसते. इथे पाहा क्रितीचे काही सुंदर पण बोल्ड फोटो.. (सर्व फोटो- योगेन शाह)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kriti sanon hot look in short mini dark blue dress see photos
छोट्या ड्रेसमध्ये बोल्ड क्रिती सेनॉन, लाखांच्या जवळपास आहे बॅगची किंमत


मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या रोहित धवनच्या ऑफिसमध्ये क्रिती गेली होती. या कामाशी संबंधित भेटी दरम्यान, अभिनेत्रीने काही खास कपड्यांची निवड केली. तिचा हा शॉर्ट ड्रेस स्टायलिश तर आहेच शिवाय आरामदायीही आहेच. तिने आपला संपूर्ण लूक अशा प्रकारे स्टाइल केला की तो स्पोर्टी लुक तर देतच होतो शिवाय 'गर्ली व्हाइब्ज'ही देत होता. मास्कमुळे चेहरा लपला असला तरी क्रिती फार सुंदर दिसत होती यात काही शंका नाही.


मिनी ड्रेसमध्ये ट्रोल झाली क्रिती

क्रितीने गडद निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. याची फिटिंग बॉडीकॉन असल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. या सुंदर ड्रेसचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे स्ट्रॅप स्लीव्ह, स्क्वेर नेकलाइन आणि ड्रेसच्या पुढे असणारे बटन. या ड्रेसमध्ये क्रितीची मादकता दिसत होती जी अनेक युझर्सना आवडली नाही.


हातात होती हजारोंची बॅग

अभिनेत्रीने तिचा लुक ब्रॅण्डेड बॅग घेऊन पूर्ण केला होता. तिने निवडलेली टोट बॅग ही फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस Saint Laurent कडून विकत घेतली होती. YSL हे फॅशन उद्योगातील जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रॅण्डपैकी एक आहे. कृतीच्या हातात असलेली बॅग १०० टक्के सूतीपासून बनवण्यात आलेली आहे. या बॅगला लेदर हँडल आणि तीन एनग्रेव्डड स्नॅप बटणंही आहेत.


या धातुच्या बटणावर चांदीचं ब्रशिंग केलं गेलं आहे. बॅगेच्या पुढच्या बाजूला RIVE GAUCHE SAINT LAURENT असं लिहिण्यात आलं होतं. अधिकृत वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत १ हजार २५० डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ९२, १०३ रुपये इतकी या बॅगेची किंमत आहे.

महत्वाचे लेख