अ‍ॅपशहर

Lata Mangeshkar Health Update- वयामुळे बरे होण्यास होतोय उशीर, डॉक्टरांनी दिली माहिती

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या प्रवक्त्याने एक अपडेट दिले आहे. गायिकेची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती.

guest Arpita-Deo | Lipi 20 Jan 2022, 12:48 pm
मुंबई- दिग्गज गायिका लता मंगेशकर (लता मंगेशकर हेल्थ अपडेट) यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. लता दीदींना करोना आणि न्यूमोनियामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ९२ वर्षीय गायिकेवर ९ जानेवारीपासून दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lata mangeshkar health update singer is stable and improving
Lata Mangeshkar Health Update- वयामुळे बरे होण्यास होतोय उशीर, डॉक्टरांनी दिली माहिती


मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी एका निवेदनात सांगितले की, 'लता दीदी यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्या घरी येतील. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी (लता मंगेशकर आरोग्यावरील डॉक्टर अपडेट) सांगितले होते की दीदी अजूनही आयसीयूमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात दाखल असलेल्या लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी त्यांच्या तब्येतीच्या अपडेटसह सांगितले आहे की वृद्धापकाळामुळे त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागत आहे.


वास्तविक, लता मंगेशकर यांच्या घरातील एक कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह झाला होता, त्यामुळे लताजींनाही संसर्ग झाला. त्यांच्या तब्येतीबद्दल जाणून घेतल्यानंतर, अनेस सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. २०१९ मध्येही लतादीदींना फुफ्फुसाचा गंभीर आजार आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने इस्पितळात दाखल करावे लागले होते.

महत्वाचे लेख