मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना सदिच्छा भेटी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात गेले आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे शिवाजी पार्क इथं असलेल्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन नतमस्तक झाले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. 'काय तमाशा लावलाय?' हेमांगी कवीच्या नव्या लूकची होतेय चर्चा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकालाही भेट दिली. त्याचबरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यादरम्यानचा फोटोदेखील समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहित त्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
शरद पोंक्षे यांची पोस्ट
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे.'
'गोवा ट्रीपला २०-२५ हजार खर्च करता मग..', सोशल मीडियावर होतंय संतोषचं कौतुक
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक युझर्सनी कमेन्ट केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी सावरकर स्मारकाला आवर्जून भेट दिल्याबद्दल कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर पोंक्षे यांनी त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये आजारपणात शिंदे यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला आहे. त्याच पोस्टमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दलही अभिनेत्याने अभिनंदन केलं होतं.