अ‍ॅपशहर

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं करोनाने निधन, एकेकाळी होते आर्मी ऑफिसर

major bikramjeet kanwarpal : प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं आज करोनाच्या संक्रमणामुळे निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2021, 11:05 am
मुंबई- अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं करोनामुळे निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. सिनेनिर्माते अशोक पंडित यांनी अभिनेत्याच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'आज सकाळी कोविडमुळे अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. ते एक सेवानिवृत्त सेना अधिकारी होते. त्यांनी अनेक सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. त्यांच्या कुटुंबियांना ताकद मिळावी.'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बिक्रमजीत कंवरपाल


या सिनेमांमध्ये दाखवली अभिनयाची ताकद

भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ मध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी पेज ३, रॉकेट सिंग: सेल्समॅन ऑफ द इअर, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स आणि द गाजी अटॅक यांसारख्या सिनेमांत अभिनय केला.



टीव्ही मालिकांमध्येही केलं काम

सिनेमांशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है आणि २४ या मालिकांमध्ये काम केलं. दरम्यान, करोना महामारीमुळे मनोरंजन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. आतापर्यंत करोना व्हायरसमुळे अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाचे लेख