मुंबई : सध्या मुंबईत धूमधार पाऊस सुरू आहे. मलायका अरोरा हा पाऊस एंजाॅय करत आहे. मोसम किती रोमँटिक आहे, असं म्हणतेय. मलायकानं इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरबरोबरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याबरोबर ती रोमँटिक मोसमाबद्दल लिहितेय. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अनेक भागांमध्ये पाणी भरलंय. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झालाय.पण मलायका रोमँटिक झाली आहे. तिला अर्जुनबरोबर घालवलेले रोमँटिक क्षण आठवतायत. लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल काय बोलून गेली आलिया भट्ट; कॉफी विथ करणचा प्रोमो व्हायरल
मलायकानं लिहिलं आहे, 'हा मोसम रोमँटिक आहे. थ्रोबॅक तर हवाच मग.' तिनं शेअर केलेल्या व्हिडिओत अर्जुन आणि मलायकाचे पॅरिसचे व्हिडिओ, फोटो आहेत. अर्जुननं आपला ३७ वा वाढदिवस पॅरिसला साजरा केला होता. तेव्हाचे विमानात बसण्यापासूनचे क्षण मलायकानं व्हिडिओत टिपले आहेत. तेच तिनं आता शेअर केले आहेत.
मलायकाच्या या व्हिडिओवर अर्जुन कपूरचा काका संजय कपूरनं लिहिलं आहे, वाह वा! अर्जुनची काकी महिप कपूरनं खूप हार्ट इमोजी टाकल्यात. बाॅलिवूड फ्रेंड्सपासून फॅन्सपर्यंत या व्हिडिओवर सगळ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
रेनकोट घालून सई ताम्हणकर घेतेय पावसाचा आनंद, जंगलातले Photo झाले Viral
अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. एक व्हिलन रिटर्न्स या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अर्जुन कपूर आला होता. त्या वेळी मलायका आणि त्याच्याबद्दल तो बोलला. दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. मलायका त्याच्याहून १२ वर्षांनी मोठी आहे. अर्जुन म्हणाला, 'तुमच्या कहाणीत तुम्हाला कधी हीरो व्हावं लागतं, तर कधी व्हीलन. मनापासून प्रेम केलं तर त्याचे परिणामही भोगावे लागतातच. हे परिणाम सर्वांसाठी वेगवेगळे असतात. प्रेमात खरेपणा हवा. प्रेमात तुम्हाला एका बाजूनं पाहिलं तर तुम्ही हीरो असता, दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर व्हिलन.'