अ‍ॅपशहर

जंगलात वाघ एकच असतो... अमेयने थेट सुमित राघवनला दिली तंबी, असं नेमकं काय घडलं?

Amey Wagh Post on Sumeet Raghvan: अभिनेता अमेय वाघ याची एक फेसबुक पोस्ट चाहत्यांना संभ्रमात टाकणारी ठरते आहे. त्याने या पोस्टमध्ये चक्क अभिनेता सुमित राघवनला इशारा दिला आहे.

Authored byजान्हवी भाटकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2022, 12:25 pm
मुंबई: अमेय वाघ (Amey Wagh Facebook Post) हा नव्या पिढीतील अभिनेता त्याचे ट्रेंडी फोटोज आणि त्यावरील मजेशीर कॅप्शन्ससाठी ओळखला जातो. एखाद्या वाक्यात अतिशय चपखल असं 'PUN' वापरण्याची त्याची कला सर्वश्रुत आहे. दरम्यान त्याच्या फेसबुक पोस्टही अनेकदा चर्चेत येतात. त्याच्या भूमिकांप्रमाणे या पोस्टही चाहत्यांना आवडतात. मात्र काही वेळापूर्वीच अमेयने केलेली पोस्ट चाहत्यांना संभ्रमात टाकणारी आहे. यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला आहे की अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) आणि अमेयमध्ये काही बिनसलं तर नाही आहे ना?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amey Wagh Post on Sumeet Raghvan


हे वाचा-ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं

अमेय-सुमितमध्ये सारंकाही आलबेल?

अमेयची पोस्ट चाहत्यांना गोंधळात टाकणारी आहे. अमेयने फेसबुकवर केलेल्या या पोस्टमध्ये सुमितला टॅगही केलं आहे. अमेय असं म्हणाला की, 'जंगलात राघू 'सुमित राघवन' खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. याची कृपया नोंद घ्यावी'. आता या पोस्टनंतर चाहत्यांना या दोन्ही कलाकारांमध्ये नेमकं काय घडलं आहे हे जाणून घ्यायचं आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत 'नेमका विषय काय आहे' असा सवाल केला आहे. तर काहींनी अमेयवर टीका केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, 'तू पण आता पर्सनल चालू झालास का? घरोघरी मातीच्या चुली', एकाने विचारलं की, 'हा काय Attitude?'


हे वाचा-१० वर्षांपूर्वी असा दिसायचा 'बाजीराव मस्तानी' फेम अभिनेता! भरत जाधव-संजय नार्वेकरांचा होता फॅन

आता अमेयने खरोखर सुमितवर टीका (Amey Wagh and Sumeet Raghvan) करणारी पोस्ट केली आहे की यामागे दुसरं काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एखाद्या नव्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो. अमेय किंवा सुमित याविषयी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत नाहीत, तोवर केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता चाहत्यांना अमेयकडून काय स्पष्टीकरण येईल याची उत्सुकता लागून राहिली आहे.
लेखकाबद्दल
जान्हवी भाटकर
जान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख