अ‍ॅपशहर

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या कुटुंबियांना नव्हती त्यांच्या जन्माची खात्री; जन्मावेळीच दिला मृत्यूशी लढा

Sanjay Mone: प्रसिद्ध मराठी अभिनेता संजय मोने यांच्या जन्माच्या वेळी असा काही किस्सा घडला होता, जो आश्चर्यकारक आहे. एका टॉक शो मध्ये बोलताना त्यांनी याविषयी सांगितले

Authored byजान्हवी भाटकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2022, 5:01 pm
मुंबई: मालिका, नाटक आणि सिनेमा या मनोरंजन क्षेत्रातील सर्वच व्यासपीठांवर उत्कृष्ट कामगिरी करणारे अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी अलीकडेच ‘दिल के करीब’ या लोकप्रिय टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकर करतात. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून, अलीकडच्या एपिसोडमध्ये सुलेखा यांनी संजय मोने यांच्यासह दिलखुलास गप्पा मारल्या. संजय यांचा अंदाज नेहमीच विनोदी राहिला आहे, मात्र त्यांनी साकारलेल्या गंभीर भूमिकांनाही तोड नाही. या अभिनेत्याच्या आयुष्यात एक असा प्रकार घडला होता, जो नक्कीच आश्चर्यकारक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Mone


हे वाचा-अतुल कुलकर्णीला सोशल मीडियावर केलं गेलं ट्रोल; म्हणाले 'या हिंदूची लाज वाटते'

संजय यांनी यावेळी त्यांच्या जन्माच्यावेळी घडलेला एक धक्कादायक किस्सा सुलेखा यांच्या या कार्यक्रमात शेअर केला. जन्मावेळी ते वाचणार नाहीत असाच समज त्यांच्या घरच्यांचा झाला होता. सुलेखा यांनी या मुलाखतीची सुरुवात करताना असं म्हटलं की,'प्रश्न होता की बाळाला वाचवायचं की आईला. उत्तर होतं आईला. त्यामुळे बाळावर मृत असा शिक्का बसला. पण नियतीला ते मान्य नव्हतं.' सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.


संजय यांनी हा धक्कादायक प्रसंग या कार्यक्रमात शेअर सांगताना म्हटले की, त्यांच्या जन्मावेळी काही वैद्यकीय अडचणी होत्या. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आई किंवा मुल दोघांपैकी एकालाच वाचवता येणं शक्य होतं. पण सुदैवाने संजय यांच्या आईसह त्यांचाही जीव वाचला.

हे वाचा-माधुरीची निवड होऊन या अभिनेत्रीने केलं रिप्लेस, शाहरुखच्या सिनेमाची Inside Story

हा प्रसंग सांगताना संजय असं म्हणाले की, 'माझे वडील त्यावेळी नाटकात काम करत होते. माझ्या जन्मावेळी ते नागपूरमध्ये गेले होते आणि आईची अशी अवस्था होती. त्यावेळी आजोबांनी सुनेला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे डॉक्टरांनी माझ्या आईला वाचवलंही पण मोठ्या शर्थीने त्यांनी मलाही वाचवलं. सगळं नीट झाल्यानंतर माझे वडील दौऱ्यावरुन परतले. त्यावेळी वडिलांमध्ये आणि आजोबांमध्ये काही चर्चा झाली आणि त्यानंतर वडिलांनी नाटक सोडंल.’
लेखकाबद्दल
जान्हवी भाटकर
जान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख