अ‍ॅपशहर

कॅन्सर, करोनामुळे पैसे संपल्यानंतर शरद पोंक्षेंनी सुरू केलाय नवीन व्यवसाय, म्हणाले कधी कधी...

Sharad Ponkshe Viral Video: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे हे 'राष्ट्राय स्वाहा' हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा कार्यक्रम करतात. व्याख्याने देतात. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडओ व्हायरल झालाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 1:14 pm
मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय आणि परखड विचार मांडणारे अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शरद हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. आपली मतं ते निर्भीडपणे ट्विटर, फेसबुकवर मांडत असतात. चित्रपट, मालिका करता करता पोंक्षे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad ponkshe news in marathi

व्याख्यानंही देतात. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण त्यांनी नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

चित्रपट, मालिका आणि व्याख्यानं...हे सगळं सांभाळून पोंक्षेंनी आणखी एक व्यवसाय सुरू केलाय. एका व्याख्यानादरम्यान ते बोलता बोलता याबद्दल सांगून गेले. करोनाकाळा सर्वांसाठीच अवघड असता होता. त्यात पोंक्षे यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. त्यामुळं या कठिण काळात त्यांनी आर्थिक अडचणींना कशी मात दिली, याबद्दल त्यांनी सांगितलं.

View this post on Instagram A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

काय म्हणाले शरद पोंक्षे?
करोना काळामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणं मनोरंजन क्षेत्रानंही खूप काही सोसलं. २०१९मध्ये कॅन्सर आणि त्याच्या उपचारांमुळं बॅंक बॅलन्स संपला होता. थोडा फार पैसा होता, पण त्यानंतर लॉकडाऊन लागला. मनोरंजन क्षेत्रातला काम बंद होतं. त्यामुळं वेगळं काही तरी करण्याचा विचार केला. त्यानंतर मी आण माझे चार पाच मित्र चितळे बंधू यांना भेटलो. आम्ही दोन ठिकाणी चितळेंची शाखा सुरू केली. त्यातल्या एका दुकानात मी शूटिंग नसलो की, बसतो, असंही पोंक्षे म्हणाले.

इतकंच नाही, तर दुकानात बसल्यानंतर येणारे अनुभव, घडनारे किस्से ही पोंक्षेंनी शेअर केले आहेत. कधी दुकानात, हिशोब करायला, बिलं घ्यायला गल्ल्यावर बसतो. तेव्हा येणारे ग्राहकही अनेकदा गोंधळतात. तुम्ही अभिनेते शरद पोंक्षे सारखे दिसता...असंही म्हणतात. तेव्हा मी पण कोण शरद पोंक्षे, ते इथं कशाला येतील..असं म्हणून मस्करीही करतो, तेव्हा दुकानातील कर्मचारीही प्रचंड हसतात, असे बरेच किस्से शरद पोंक्षे यांनी कार्यक्रमात शेअर केले आहेत.

महत्वाचे लेख