अ‍ॅपशहर

नाचो! नाटू नाटू’ ऑस्करच्या शर्यतीत, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग विभागात मिळालं नामांकन

Oscar Nominations 2023: काही दिवसांपूर्वी झालेल्या ८०व्या गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड्समध्ये छाप पाडल्यानंतर दिग्दर्शक राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाच्या नाटू नाटू गाणं आता ऑस्करच्या शर्यतीत आलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 8:44 pm
मुंबई: जगभरातील दिग्गज कलाकार आणि कोट्यवधी सिनेरसिकांच्या दृष्टीनं सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्कारांची उत्सुकता प्रत्येक वर्षी असते. हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी खास ठरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील अनेक चित्रपटांनी वाहवा मिळवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Naatu Naatu


२०२३चा ऑस्कर सोहळा भारतीय चित्रपसृष्टीसाठी खास असणार आहे. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्सतर्फे ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

'नाटू नाटू'चा समावेश

‘ऑस्कर’ची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या प्रचंड लोकप्रिय गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग-मोशन पिक्चर या श्रेणीतील पुरस्कार मिळाला .‘नाटू नाटू’ या तेलुगु गाण्याला एम. एम. क्रीम यांनी संगीत दिलं आहे, तर काल भैरव (त्यांचा मुलगा) आणि राहुल सिप्लीगुंज यांनी आवाज दिला आहे.


दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'आरआरआर' या सिनेमाला मिळत असलेलं यश हे भारतीय सिनेमासाठी आशादायी आहे, असं सिनेतज्ज्ञ म्हणताहेत. एमएम किरवानी यांनी संगीतबद्ध केलेल्या 'नाटू नाटू' या गाण्याला क्रिटिक्स चॉईस अॅवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट संगीत हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानं किरवानी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करताना दिसले. दिग्दर्शक राजामौली यांनी विश्वास ठेवल्याबद्दल आणि पूर्ण स्वातंत्र्य दिल्याबद्दल किरवानी यांनी त्यांचे आभार मानले.
शाहरुखचा जबरा फॅन! अमरावतीकर चाहत्याने बुक केलं अख्खं थिएटर; रीलिजआधीच 'पठाण'ची हवा
हिंदीतही लोकप्रिय...
‘नाटू नाटू’चे संगीतकार एम. एम. किरवानी हिंदी चित्रपटरसिकांना एम. एम. क्रीम या नावानं परिचित आहेत. ‘तुम मिले दिल खिले’ (क्रिमिनल), ‘तुम आये तो आया मुझे याद’ (जख्म) या प्रचंड लोकप्रिय गाण्यांबरोबरच ‘सूर’ आणि ‘जिस्म’, ‘इस रात की सुबह नहीं’, ‘पहेली’ या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांतील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. तमिळ आणि मल्याळम चित्रपटरसिक त्यांना मार्गाथामणी या नावाने ओळखतात. ते राजामौळी यांचे चुलत बंधू आहेत.

डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म विभागतही नामांकन
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. तर ‘ऑल दॅट ब्रीद्ज’ हा लुघपटही नामांकनाच्या शर्यतीत होता.

महत्वाचे लेख