अ‍ॅपशहर

मौनी रॉय अडकणार विवाहबंधनात; तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल हे माहित्येय का?

नागिन मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ती दुबईतील तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत २७ जानेवारी २०२२ रोजी लग्नं करणार आहे. मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सूरज काय करतो आणि तो आहे कोण असा प्रश्न मौनी रॉयच्या चाहत्यांना पडला आहे.

guest Arpita-Deo | Lipi 16 Jan 2022, 10:45 am
मुंबई: 'नागिन' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मोनी लवकरंच लग्न बंधनात अडकणार आहे. मौनी, बॉयफ्रेंड सूरज नांबियार सोबत २७ जानेवारीला २०२२ ला लग्न करणार आहे. मात्र मौनीचा होणारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagin fame actress mouni roy is all set to get married to suraj nambiar who is he
मौनी रॉय अडकणार विवाहबंधनात; तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल हे माहित्येय का?

नवरा सूरज आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सूरज नांबियारचा जन्म कर्नाटकमधील बंगलोर येथील जैन कुटुंबात झाला. त्याचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल शाळेत झाले आहे. २००८ मध्ये त्याने बंगळुरुच्या आरव्ही इंजिनीअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीरिंग पूर्ण केलं. त्याला एक लहान भाऊ आहे ,जो पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक आहे. सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे. सूरज सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते आणि त्याच्या प्रोफाइल फोटोकडे बघता त्याला फिरण्याची आवड असल्याचे समजते.
View this post on Instagram A post shared by MOUNI ROY💎 (@mounirooy)

अशी सुरू झाली सूरज आणि मौनी रॉयची प्रेमकथा
सूरज नांबियारसोबत मौनी रॉयची पहिली भेट दुबईत झाली होती. काही काळानंतर दोघेही डेट करू लागले. जरी त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही, तरीही त्यांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान मार्च महिन्यात, ती सूरजच्या कुटूंबियांना जवळची मैत्रीण मंदिरा बेदीच्या घरी भेटली. त्यानंतर ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अस म्हटलं जात आहे की ते दोघं २७ जानेवारी २०२२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

कुठे होणार लग्न?
मौनी रॉय सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्न करणार आहे. त्यांचा विवाह २७ जानेवारीला होणार आहे, तर त्यांचा संगीत आणि हळदी समारंभ २६ जानेवारीला पार पडेल. मात्र करोनाने पुन्हा मान वर काढली असल्याने फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज