अ‍ॅपशहर

प्रसिद्ध अभिनेत्री चौथ्यांदा प्रेग्नंट, चाहते म्हणाले - जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत ही बाळांना जन्मच देत राहणार

Neeru Bajwa pregnancy- पंजाबी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नीरू बाजवा चौथ्यांदा आई होणार आहे आणि तिने स्वतः ही पोस्ट शेअर करून सांगितलं आहे. यावर चाहत्यांनी तिला मुलगा होईर्यंत बाळ जन्माला घालणार का असा प्रश्न विचारला.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2022, 11:49 am
मुंबई- पंजाबी सिनेसृष्टीत खास ओळख असलेली लोकप्रिय अभिनेत्री नीरु बाजवा चौथ्यांदा आई होणार आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच नीरुला पंजाबी सिनेसृष्टीत निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणूनही ओळखले जाते. नीरु सध्या तिच्या चौथ्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, ही बातमी शेअर करताच नीरुला अभिनंदनाच्या कमेन्टसोबतच कितींदा प्रेग्नंट होणार असा प्रश्न विचारत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neeru bajwa


नीरु बाजवा आपल्या बाळासाठी फार उत्साही आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिने सोनोग्राफीची एक झलकही चाहत्यांसोबत शेअर केली. यासोबतच तिने लिहिले की, 'रब दी मेहर है, मी पुन्हा आई होणार आहे.' तिने यावेळी बेबी शॉवरबद्दलही सांगितले आणि चाहत्यांना तिच्या आनंदात सहभागी होण्याची विनंती केली.

View this post on Instagram A post shared by Neeru Bajwa (@neerubajwa)

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'ही बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला फार आनंद होत आहे.' या पोस्टवर नीरुच्या मित्र- परिवाराने आणि चाहत्यांनी अभिनंदनाच्या कमेन्ट केल्या तर काही नेटकऱ्यांनी तिला मुलगा होईपर्यंत बाळंत होणार का असा थेट सवालही विचारला आहे. नीरुला तीन मुली आहेत आणि अनेकदा त्यांचे फोटो अभिनेत्री शेअर करत असते. पण, यासोबतच तिने अजून एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

View this post on Instagram A post shared by Neeru Bajwa (@neerubajwa)

त्याचं झालं असं की, आई झाल्याची बातमी शेअर केल्यानंतर नीरूने तिच्या आगामी 'ब्युटीफुल बिल्लो' सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं, ज्यामध्ये ती गरोदर दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - बिल्लो आई होणार आहे, ११ ऑगस्ट रोजी बिल्लोचे अभिनंदन करण्यासाठी झी ५ वर या.

चाहतेही पडले संभ्रमात

आता एकीकडे सोशल मीडियावर तिचे बेबी बंप असलेले फोटो तर दुसरीकडे चित्रपटाचे हे पोस्टर शेअर केल्यामुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. नेमकी काय सत्य आहे हे त्यांना कळत नाहीये. पण लवकरच त्यांचा हा संभ्रम दूर होईल यात काही शंका नाही.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख