मुंबई: रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल ११' ची परीक्षक आणि गायिका नेहा कक्कर सध्या अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. शोचं परीक्षण करताना रडणं असो किंवा मग आदित्य नारायणसोबतचं लग्न. रोजचं तिच्याबद्दल गॉसिप होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच तिची चर्चा सुरू असते. तिचे मिम्स व्हायरल होत असतात. पण नेहाचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिनं तिच्या या प्रवासाबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहे.
नेहाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नेहा आणि तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरण कार्यक्रमांमध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर ती 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोमध्ये नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिथूनच तिचा हा यशाचा प्रवास सुरू झाला. तिनं नंतर मागं वळून पाहिलं नाही. नेहाकडं आता प्रसिद्धी, पैसा सर्व काही आहे. पण तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा हा थक्क करणारा प्रवास दिसून येतोय.
नेहानं ऋषिकेशमध्ये एक अलिशान असा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याचा फोटो शेअर करतना तिनं आणखी एका घराचा फोटो शेअर केला आहे. तो फोटो आहे तिच्या जुन्या घराचा. नेहाचं बालपण याच भाड्याच्या खोलीत गेलं. तिच्या या प्रवासाबद्दल ती स्वत: भावुक झाली. तिनं लिहिलं की, ' हा बंगला आता आम्ही ऋषिकेशमध्ये खरेदी केला आहे, तर दुसरा फोटो जुन्या घराचा आहे जिथं आमचं कुटुंब राहायचं. एका खोलीत टेबलावरच आईनं स्वयंपाकघ तयार केलं होतं. ही खोली देखील आमची नव्हती. या खोलीचं आम्ही भाडं द्यायचो. यात शहरात आम्ही आता स्वत:चा बंगला खरेदी केला आहे'. नेहानं #selfmade असा हॅशटॅगही दिला आहे.
नेहा कक्करनं गरीब मुलांना वाटल्या दोन हजारांच्या नोटा
या प्रवासासाठी नेहानं तिच्या चाहत्यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले आहेत. 'इंडियन आयडॉल ११' या शोचं परिक्षण करताना नेहाच्या डोळ्यात सतत पाणी येतं. स्पर्धकांच्या खडतर प्रवासाच्या घटना ऐकल्यांतर ती भावुक होते. याबद्दल तिला अनेकदा ट्रोल करण्यात येतं. परंतू तिनं देखील हा प्रवास अनुभवला आहे. नेहाची आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली आहेत.
नेहा टीव्हीवर रडली आणि मला विलन ठरण्यात आलं: हिमांश कोहली