अ‍ॅपशहर

Ranbir Kapoor: जेव्हा रणबीर कपूरने केलेला खुलासा, 'भांडणानंतर माझी एक EX माझे अवॉर्ड तोडायची'

रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आलिया भट्टच्या (Alia Bhatt) आधी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि कतरिना कैफला (Katrina Kaif) डेट केले होते.

guest Arpita-Deo | Lipi 12 Jan 2022, 9:50 am
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा चाहता वर्ग किती मोठा आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. रणबीत त्याच्या सिनेमांपेक्षा जास्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सध्या आलिया भट्ट ला डेट करत असलेल्या या अभिनेत्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याची एक गर्लफ्रेंड होती, जी भांडण झाल्यावर त्याने मेहनतीने मिळवलेले पुरस्कार तोडायची. रणबीरने आलियापूर्वी दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफला डेट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one of ranbir kapoor ex girlfriends broke his awards says actor
Ranbir Kapoor: जेव्हा रणबीर कपूरने केलेला खुलासा, 'भांडणानंतर माझी एक EX माझे अवॉर्ड तोडायची'


२०१७ मध्ये रणबीर कपूरने फिल्मफेअरला ही मुलाखत दिली होती. एकामागून एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतरची त्याची भावना काय होती ते त्याने या मुलाखतीत सांगितली होती. त्यातही २०११ मध्ये रॉकस्टारसाठी क्रिटिक चॉईस आणि पॉप्युलर अवॉर्ड हे पुरस्कार जिंकणं त्याच्यासाठी फार खास होतं.

भांडण झाल्यावर तोडायची पुरस्कार

मुलाखतीदरम्यान खुलासा करताना रणबीर कपूर म्हणाला, 'माझी एक गर्लफ्रेंड होती, जेव्हाही आम्ही भांडायचो तेव्हा ती पुरस्कार तोडायची.' यावेळी तो हसत म्हणायचा, 'अरे तो फिल्मफेअर आहे, त्याला हात नको लावू.'

View this post on Instagram A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

आलियासोबत साजरे केले नवीन वर्ष

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी नुकतेच नवीन वर्ष एकत्र साजरे केले. कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघंही अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया देखील या सिनेमात आहेत. ९ सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय रणबीरकडे 'शमशेरा' ही आहे. त्याचबरोबर आलिया 'गंगूबाई काठियावाडी', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'आरआरआर'सह इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज