अ‍ॅपशहर

ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं

Louise Fletcher Death: 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' या सिनेमात काम केलेल्या आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. लुईसचे एजंट डेव्हिड शॉल यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

Authored byजान्हवी भाटकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2022, 9:15 am

हायलाइट्स:

  • ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन
  • फ्रान्समधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
  • अभिनेत्रीला झोपेतच गाठलं मृत्यूने
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम louise fletcher
मॉन्टदुरास: १९७५ साली आलेल्या 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' या चित्रपटात खलनायकी नर्सची भूमिका करणाऱ्या ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. लुई फ्लेचर यांनी २३ सप्टेंबर रोजी फ्रान्समधील मॉन्टदुरास याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. लुईस यांनी झोपेतच या जगाचा निरोप घेतला. त्यांचे एजंट डेव्हिड शॉल यांनी शुक्रवारी असोसिएटेड प्रेसला याविषयी माहिती दिली असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
लुईस यांच्या विविध भूमिका चाहत्यांना नेहमीच आठवणीत राहणाऱ्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा लुईस यांना दिग्दर्शक मिलोस फोरमन यांनी 'कुकूज नेस्ट'मध्ये नर्सच्या भूमिकेसाठी कास्ट केले होते तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. प्रेक्षकांसाठी त्यांचा चेहरा नवीन होता. 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' हा सिनेमा १९३४ च्या 'इट हॅपनड वन नाईट' नंतरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट कथा जिंकणारा पहिला चित्रपट ठरला.

हे वाचा-शूटिंगदरम्यान रिंकूने एकाला कारने दिली धडक, म्हणाली-त्यानेच गाडीसमोर उडी मारली

हा सिनेम १९७५ वर्षात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. १९७६ साली झालेल्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात लुईस यांनी ऑस्कर हातात घेऊन असं म्हटलं होतं की, 'असं वाटतं की तुम्ही सगळे माझा तिरस्कार करता.' फ्लेचर यांनी 'कुकूज' व्यतिरिक्त 'ममा ड्रॅक्युला', 'डेड किड्स' आणि 'द बॉय हू कॅन फ्लॅय' या सिनेमात काम केले आहे. अभिनेत्री तिच्या मुलांसह फ्रान्समध्ये राहत होती.

हे वाचा-नाव जोडलं गेलं एकीशी पण अफेअर दुसऱ्याच वकिलीण बाईंशी! कोर्टरुम ड्रामानंतर जॉनी डेप पुन्हा प्रेमात

लुईस शेवटचे नेटफ्लिक्सच्या एका कॉमेडी सीरिजमध्ये दिसल्या होत्या. २०१७ साली ही 'गर्लबॉस' नावाची विनोदी सीरिज आली होती, त्यात त्यांनी काम केलेले. १९५८ पासून त्यांनी 'लॉमन' या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यानंतर त्या टीव्ही मालिका Maverick मध्ये दिसलेल्या. करिअरसोबतच लुईस यांचे वैयक्तिक आयुष्यही विशेष चर्चेत होते. लुईस फ्लेचर यांनी १९६० सालीनिर्माता बेरी झिकशी लग्न केले पण १९७७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. लुईस यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी ११ वर्षांचा ब्रेक घेतला होता.
लेखकाबद्दल
जान्हवी भाटकर
जान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख