अ‍ॅपशहर

तू माझ्यासाठी नेहमीच... थोरल्या भावाच्या निधनानं महेश बाबू भावुक

महेश बाबू याचे थोरले भाऊ रमेश बाबू याचं वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झालं आहे.महेश बाबूने त्याला श्रद्धांजली वाहिली असून स्वतःचे प्रेरणा स्थान म्हंटलें आहे.

guest Ganesh-Mhaske | Lipi 10 Jan 2022, 8:36 am
मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर सध्या दुहेरी संकट आलं आहे. त्याला करोनाची लागण झाली असतानाच त्याचे बंधू रमेश बाबू यांचे निधन झालं आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महेश बाबू सध्या क्वारंटाइन असून त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramesh babu death you will always be my annayya says mahesh babu
तू माझ्यासाठी नेहमीच... थोरल्या भावाच्या निधनानं महेश बाबू भावुक


महेश बाबूला करोना झाल्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. भावाच्या निधनानं त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यानं त्याचं दु:ख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळे आहे, तू माझं प्रेरणास्थान आहे, माझी शक्ती, धैर्य सर्वस्व आहेस. माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी खूप धन्यवाद असं महेश बाबूनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)


रमेश बाबू यांनी १९७४ मध्ये 'अल्लुरी सीताराम राजू' या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी जास्त चित्रपट केले नसले तरी १५ अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. १९९७मध्ये त्यांनी अभिनयाला राम-राम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांनी महेश बाबूसाठी अर्जुन आणि अतिथी या दोन चित्रपटांची निर्मिती केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज