अ‍ॅपशहर

सैफने पुन्हा केली तीच चूक; 'तान्हाजी'त घडलेला प्रकार 'आदिपुरुष'मध्ये सुधारण्यात अभिनेत्याला अपयश

Saif Ali Khan- सध्या आदिपुरुष सिनेमाबद्दल सर्वाधिक चर्चा होत आहे. यातही सैफ अली खानने साकारलेल्या रावणावर फारसे लोक आनंदी नाही. लंकाधीपती रावण असा दिसायचाच नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. असं असताना सैफची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2022, 8:13 pm
मुंबई- सैफ अली खानने ओम राऊत दिग्दर्शित तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्याच्या भूमिकेवर अनेकांनी टीकाही केली. विशेष म्हणजे सैफने स्वतः या सिनेमावर इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Saif Ali Khan


अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, उदयभान राठोडचे पात्र अतिशय आकर्षक होते, त्यामुळे ते सोडू शकत नव्हते, परंतु त्यात राजकीय कथन बदलले आहे आणि ते धोकादायक आहे. त्याचवेळी सैफनेही कबूल केले की, 'काही कारणास्तव मी भूमिका घेऊ शकलो नाही, कदाचित पुढच्या वेळी मी तसे करेन. मला हे पात्र अतिशय आकर्षक वाटल्यामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक होतो. पण हा इतिहास नाही. इतिहास म्हणजे काय हे मला चांगलं माहीत आहे.

अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सैफ म्हणाला होता की, उदयभान राठोडचं पात्र अतिशय आकर्षक होतं, त्यामुळे ते सोडू शकलो नाही. परंतु त्यात राजकीय अजेंड्यामुळे अनेक बदल केले गेले आणि ते धोकादायक आहे.' त्याचवेळी सैफने हेही मान्य केलं होतं की, 'काही कारणास्तव मी यावर माझी ठामपणे भूमिका घेऊ शकलो नाही, कदाचित पुढच्या वेळी मी तसं करेन. मला हे पात्र अतिशय आकर्षक वाटल्यामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक होतो. पण हा इतिहास नाही. इतिहास काय हे मला चांगलं माहीत आहे.'

दरम्यान, सैफने तानाजी सिनेमात झालेली चूक पुन्हा करणार नाही असं सांगितलं असताना 'आदिपुरुष' सिनेमातही सैफने नेमकी तिच चूक केली. या सिनेमात सैफने रावण साकारला आहे, मात्र त्यातही तो शिवभक्त कमी आणि खिलजी जास्त वाटतो असा आरोप सातत्याने होत आहे. लंकाधिपती रावणाचा अभ्यास करण्यात दिग्दर्शक कमी पडला अशी प्रतिक्रिया येत आहे. आता संधी मिळूनही सैफने आपली जुनी चूक का सुधारली नाही असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सातत्याने विचारला जात आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज