अ‍ॅपशहर

सलमान खानला फार्महाउसवर मारण्याचं केलेलं प्लॅनिंग, बिश्नोई गँगच्या प्लॅन बीचा झाला खुलासा

Salman Khan: बिश्नोई टोळीने सलमान खानवर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिद्धू मूसेवाला खून प्रकरणापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन बी तयार केला होता. या प्लॅनचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2022, 3:21 pm
मुंबई- बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आयुष्यावरील संकट संपण्याचे नाव घेत नाही आहे. बिश्नोई टोळीने सलमान खानवर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Salman Khan


सिद्धू मूसेवाला खून प्रकरणापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने सलमानला मारण्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन बी तयार केला होता. या प्लॅनमध्ये गोल्डी ब्रार, कपिल पंडित (लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर) होते, ज्याला नुकतीच भारत-नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि अन्य दोन नेमबाज मुंबईतील वाजे परिसरात पनवेल येथे भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आले होते.

पनवेलमध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमानचे फार्म हाऊस असल्यानेच फार्म हाऊसच्या रस्त्यावरच लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनी ही खोली भाड्याने घेतली आणि जवळपास दीड महिना इथेच राहिले होते. लॉरेन्स बिश्नोईच्या सर्व शूटर्सच्या त्या भाड्याच्या घरात सलमानवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारी छोटी शस्त्रं, पिस्तुलं आणि काडतुसं होती.

हिट अँड रन प्रकरणात सलमानचे नाव आल्यापासून सलमानची गाडी नेहमीच कमी स्पीडमध्ये चालते हे शूटर्सना माहीत होते. जेव्हाही सलमान त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर जातो, त्याचासोबत त्याचा विश्वासू अंगरक्षक शेरासोबत असतो.

इतकंच नाही तर शूटर्सनी ज्या रस्त्यावरून सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवर जातो त्या रस्त्याचाही माग काढला होता. जर त्या रस्त्यावर खूप खड्डे असतील तर फार्म हाऊसपर्यंत सलमानच्या गाडीचा वेग ताशी २५ किलोमीटर इतकाच असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जेणेकरून शूटर्सना सलमानच्या हालचालींची सर्व माहिती मिळू शकेल. या रेकीदरम्यान दोनदा सलमान फार्महाऊसवर गेला होता, पण लॉरेन्स बिश्नोईच्या नेमबाजांचा हल्ला चुकला होता.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज