अ‍ॅपशहर

शाहरुख खानबद्दल असं काय बोलून केला अर्जुन कपूर, किंग खानचे चाहते भडकले

अभिनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे. त्याची वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच्या प्रमोशनमध्येच तो व्यग्र आहे. पण अभिनेता शाहरुख खानचे चाहते मात्र त्याच्यावर काहीसे नाराज झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2022, 2:40 pm
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर सध्या त्याच्या आगामी वेब सीरिजचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान त्यानं काही मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधला. अर्जूननं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. पण बॉलिवूडच्या बादशाहबद्दल असं काही बोलून गेला की, किंग खानचे चाहते प्रचंड चिडले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arjun kapoor  and srk


अर्जुननं अनेक विषयांवर गप्पा मारल्या. सेक्स, एका वेळी अनेक रिलेशन्स अशा विषयांवर त्यानं त्याचं मत व्यक्त केलं.अर्जूनला असा एक प्रश्न विचारला की, त्याचं उत्तर देताना त्यानं शाहरुखबद्दल अजब वक्तव्य केलंय. त्यामुळं त्याच्या या वक्तव्याची प्रचंड चर्चा सुरू आहे.
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर सनी कौशलनं सोडलं मौन, लोक आम्हाला वेडं समजतील
एका रिपोर्टरनं असा प्रश्न विचारला की, आपली संस्कृती ही आपल्या देशाची ओळख आहे. जिथं लग्नापूर्वी सेक्स करणं योग्य मानलं जात नाही. एका वेळी अनेक पार्टनर्स असणं आणि लग्नापूर्वी सेक्स करणं याबद्दल तुला काय वाटतं?

या प्रश्नावर अर्जुन म्हणाली की, ही ओळख कोणी बनवली आहे? यावर प्रश्न विचारणारा रिपोर्टर म्हणाला की, शाहरुख खान. यावर शाहरुख म्हणजे भारताची ओळख नाहीय. त्यामुळं अशी काही ओळख आहे, हे म्हणणं चुकीचं असल्याचं अर्जुननं म्हटलं आहे.
अभिमानास्पद! विजय देवरकोंडाला मिळाली आईची साथ, अनेक वर्षांची इच्छा माय- लेकांनी केली पूर्ण
अर्जुननं शाहरुख ही भारताची ओळख नाही, असं म्हटल्यामुळं किंग खानचे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज