अ‍ॅपशहर

'स्त्रियांनी काय कपडे घालावे...' संभाजी भिडेंच्या टिकली वादात शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

Sharad Ponkshe मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शरद यांनी सध्या सुरू असलेल्या टिकली वादावरून एक खोचक पोस्ट शेअर केली आहे.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2022, 3:23 pm
मुंबई- संभाजी भिडे यांच्या टिकली लाव मग बोलतो या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ सुरू झाला. महिला पत्रकाराला दिलेल्या या वागणुकीमुळे एकीकडे काहींनी त्यांना विरोध केला तर काहींनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. गेले काही दिवस टिकली या विषयावर नेटकरीदेखील वाद घालताना दिसत आहेत. अशातच आता लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे यांनीही या वादावर समर्पक अशी पोस्ट शेअर केली आहे. स्त्रियांनी टिकली लावावी की लावू नये यासोबतच कोणते कपडे घालावेत यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad ponkshe


शरद यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एका चर्चबाहेर लावलेला फलक शेअर केला आहे. त्यावर स्त्रियांनी आणि पुरुषांनी चर्चमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कसे कपडे परिधान करावेत याचे निर्देश दिलेले आहेत. खोल गळा, स्लिव्हलेस, गुडघ्यांच्या वर असलेला, पाठ दिसेल असा अशा प्रकारचे कपडे आत चालणार नाहीत आणि कुणी तसे कपडे परिधान करून आल्यास पाद्री ते कपडे बदलायला लावतील असे निर्देश त्यावर आहेत. हा फोटो शेअर करत शरद यांनी लिहिलं, 'एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. इथे स्लिवलेस,शॉर्ट्स, क्रॉप टॉप किंवा मिनी घालून गेल्यास पाद्री कपडे बदलून या मगच सोडेन असे सांगतात. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.सद्य स्थितीशी ह्याचा काहीही संबंध नाही फक्त जे वाटल दिसल ते पोस्ट केलं.'


सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या टिकली वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या या पोस्टला दुजोरा दिला आहे. सध्याच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर शरद यांची पोस्ट नेटकऱ्यांमध्ये व्हायरल झाली आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज