अ‍ॅपशहर

Dasara Melava एकनाथ शिंदेंनी अर्जुनाची भूमिका बजावली, शरद पोंक्षेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

Shinde Group Dasara Melava 2022- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याकडे अनेकांचं लक्ष आहे. अशात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यासपिठावरून भाषण देत शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 8:01 pm
मुंबई- बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. शिंदे समर्थकांनी मैदानावर एकच गर्दी केली आहे. आज मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय बोलणार आहेत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी बीकेसी मैदानात हजर राहिलेली दिसली. यातलं पहिलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे. आपल्या अवघ्या ५ ते ६ मिनिटांच्या भाषणात शरद यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना अर्जुनाशी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad ponkshe


काय म्हणाले शरद पोंक्षे-

व्यासपिठावर येताच शरद यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं. अभिनेते म्हणाले की, 'आज प्रभू श्रीरामाने रामाला मारलं तो दिवस. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावरून शस्त्र खाली काढली आणि लढायला सुरुवात केली तो दिवस. मला यावेळी दोन गोष्टी आवर्जुन सांगायच्या आहेत. रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण यानने आपल्याचा भावाविरुद्ध जाऊन रामाला मदत केली. बिभीषणाची सद्सदविवेकबुद्धी जागृक होती. त्याला माहीत होतं की हे धर्म- अर्धमाचं युद्ध आहे. निती- अनितीचं युद्ध आहे. या युद्धात आपल्याला सत्याचीच साथ द्यायची आहे. त्यामुळे रामाकडून कोणतंही निमंत्रण न मिळता बिभीषण आपल्या सख्या भावाविरोधात लढला. त्या बिभीषणाचा कोणीही गद्दार असा उल्लेख केला नाही.'

अर्जुनाची दिली उपमा

महाभारताचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली. धर्मग्रंथ म्हणून आपण त्याकडे पाहतो. युद्धात पांडव आणि कौरव जेव्हा समोरा- समोर उभे ठाकले तेव्हा समोर कर्ण होता. कर्णला हरवणं अशक्य होतं. अशावेळी श्रीकृष्णाने कर्णाचा रथ चिखलात रुतलेला पाहिला. ते रथाचं चाक बाहेर काढण्यासाठी जेव्हा कर्ण खाली उतरला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याला मारण्यास सांगितलं. त्यावेळी अर्जुन म्हणाला असं कसं मारू. तो निशस्त्र आहे. यावर श्रीकृष्ण म्हणाला की ज्याक्षणी त्याने अर्धमाची साथ दिली, दुर्योधनाची साथ दिली त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत त्याला मारण्याचा अधिकार कर्णानेच तुला दिला आहे. त्या अर्जुनाला नंतर कोणीही पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं नाही.

आज एकनाथ शिंदेंनी अर्जुनाची भूमिका बजावली आहे. सद्सदविवेकबुद्धी जागरुक ठेवून योग्यवेळी ज्या बाळासाहेबांनी हिंदूत्वाचा पुरस्कार केला. जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, ज्या दिवशी माझा मुख्यमंत्री येईल तेव्हा मी संभाजीनगर हे नाव ठेवीन, माझा मुख्यमंत्री येईल तेव्हा मी मशीदींवरचे भोंगे खाली उतरवेन. त्यांच्या मुलाने यातलं काहीच केलं नाही. सतत देवांची विटंबना करणाऱ्या मंत्र्यांसोबत जाऊन बसले. एकनाथ शिंदे यांनी उचललेलं पाऊल किती योग्य होतं हे इथे बसलेला जनसमुदाय सिद्ध करतो आहे.

बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. शिंदे समर्थकांनी मैदानावर एकच गर्दी केली आहे. आज मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय बोलणार आहेत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज