अ‍ॅपशहर

श्रद्धा कपूरनं केलं राजस्थानमधील 'त्या' गावाचं कौतुक

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं प्राणीप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. भूतदया दाखवण्यात श्रद्धा नेहमीच पुढे असते. तिनं अलीकडेच एक लेख सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या लेखामध्ये राजस्थानमधील एका गावच्या रहिवाशांनी, तहानलेल्या जनावरांना पाणी पिता यावं म्हणून जलाशय तयार केले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2020, 7:46 pm
मुंबई: अभिनेत्री श्रद्धा कपूरचं प्राणीप्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. भूतदया दाखवण्यात श्रद्धा नेहमीच पुढे असते. तिनं अलीकडेच एक लेख सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या लेखामध्ये राजस्थानमधील एका गावच्या रहिवाशांनी, तहानलेल्या जनावरांना पाणी पिता यावं म्हणून जलाशय तयार केले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरनं केलं राजस्थानमधील 'त्या' गावाचं कौतुक


मुक्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या या गावकऱ्यांच्या प्रयत्नांचं श्रद्धानं कौतुक केलं आहे. ते करताना तिनं लिहिलं आहे, की, 'राजस्थानमधील पाली गावच्या गावकऱ्यांकडून प्राण्यांसाठी उचलण्यात आलेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नांसाठी आपण त्यांचे आभार मानू. वन्य प्राणी-पक्ष्यांनाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे.'

'पेटा'द्वारे बनवण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये ती अलीकडेच सहभागी झाली होती. प्राण्यांना कैदेत ठेवणं योग्य नाही, प्राणीसंग्रहालयं बंद केली पाहिजेत असा विचार या व्हिडीओतून मांडण्यात आला होता. मुक्या जनावरांसाठी समर्पित भावनेनं काम करणाऱ्या अनेक संघटनांना श्रद्धा वेळोवेळी सहाय्य करत असते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज