अ‍ॅपशहर

प्रियांका आणि निकच्या जोडीबद्दल काय बोलून गेल्या नेटफ्लिक्सवरच्या सीमा टपारिया

sima taparia comment about priyanka chopra and nick लग्न जुळवण्याच्या पद्धतीवर भाष्य करणारी 'इंडियन मॅचमेकिंग' ही सीरिज लोकप्रिय ठरली होती. याचाही दुसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण एका वेगळ्याच कारणामुळं हा शो सध्या चर्चेत आलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2022, 1:57 pm
मुंबई: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव कमावलं आहे. त्यांची एकूण संपत्तीही अनेक कोटी आहे. दोघांच्या आयुष्यात आता त्यांची लेक मालती ही देखील आणखी सुख घेऊन आली आहे. असं असलं तरी दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sima taparia on priyanka chopra and nick


प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं नातं हे जास्त काळ टीकणार नाही, असं अनेकदा म्हटलं गेलंय. पण आता आणखी एका प्रसिद्ध व्यक्तीनं दोघांच्या जोडीबद्दल असं वक्तव्य केलयं की प्रियांका आणि निक यांचे चाहते नाराज झाले आहेत. लग्न जमवण्यासाठी प्रसिद्ध असलेली सीमा आंटी म्हणजेच सीमा टपारिया यांनी एका शोमध्ये प्रियांका आणि निकबद्दल वक्तव्य केलंय.

View this post on Instagram A post shared by Priyanka (@priyankachopra)

‘इंडियन मॅचमेकिंग’ (Indian Matchmaking) चा दूसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा शो सीमा टपारिया स्वत: होस्ट करत आहेत. या शोमध्ये सीमा विवाहोत्सुक मुलामुलींना लग्नाबद्दल टीप्स देतानाही दिसतात. सीमा एका क्लाइंटला जोडप्यांमधील वयाचं अंतर याबद्दल सांगत असतात. लग्न करताना दोघांमधील वयाचं अंतर पाहून लग्न करावं, असा सल्ला त्या देतात. हा सल्ला देताना त्यांनी प्रियांका आणि निकचा उल्लेख केला.

काय म्हणाल्या सीमा टपारिया?प्रियांका आणि निक यांच्या वयातत जवळपास १०-११ वर्षाचं अंतर आहे. दोघं परफेक्ट कपल वाटत नाहीत. मला माफ करा, आता त्यांनी लग्न केलंय पण त्यांची जोडी फार काही चांगली दिसत नाही. प्रियांकासमोर निक फारच लहान दिसतो प्रियांका वयानं मोठी दिसते, असं सीमा यांनी याशोमध्ये म्हटलंय. यानंतर प्रियांकाचे चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज