अ‍ॅपशहर

अरेरे! जुबीन नौटियालची आई गेली डिप्रेशनमध्ये, गायकाला बसला ट्रोलिंगचा सर्वात मोठा फटका

Jubin Nautiyal- बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणारा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांने आता त्याच्याविरोधात होणाऱ्या अटकेच्या मागणीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या सगळ्याचा त्याच्या कुटुंबावर कसा परिणाम झाला तेही त्याने सांगितले.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2022, 12:55 pm
मुंबई- काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायक जुबिन नौटियालच्या कॉन्सर्ट आणि पोस्टरवर लोकांनी निदर्शनं करत त्याच्या अटकेची मागणी केली होती. #ArrestJubinNautyal देखील सोशल मीडियावर ट्रेंड करु लागलं होतं. ज्युबिन ज्या आयोकासाठी कार्यक्रम करणार होता तो आयोजक दुसरा कोणी नसून मोस्ट वॉन्टेड जयसिंग होता. त्यामुळे त्याचा शोही रद्द झाला. लोक गायकाला देशद्रोही म्हणू लागले. आता या सगळ्यावर जुबिनने प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jubin nautiya


Photo- १८० दिवस उपवास करणाऱ्या जैन मुनींना भेटला सलमान

जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) ने आधीच ट्वीट केले होते की त्याचा शो रद्द करण्यात आला नाही. कारण सोशल मीडियावर दावा केला जात होता की त्यााचा कॉन्सर्ट यापुढे होणार नाही. आज तक डॉट इनशी बोलताना गायकाने आपले मत व्यक्त केलं. या सगळ्या गोष्टींचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम होतोय हेदेखील त्याने सांगितलं. त्याची आई दिवसेंदिवस अस्वस्थ होत असून ती नैराश्यग्रस्त झाल्याचं गायक म्हणाला. जुबिन म्हणाला की लोक त्याला देशद्रोह म्हणत आहेत त्यावर त्याच्या आईचा विश्वास बसत नाहीये.

जुबिन नौटियालने दिली प्रतिक्रिया

जुबिन म्हणाला की त्याने वर्षानुवर्षे मेहनत करून नाव कमावलं आणि लोकांनी क्षणार्धात त्याला दूर केलं आणि खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला. यानंतर त्याचा ऑगस्टमध्ये शो रद्द झाला. कॉन्सर्टचे व्यवस्थापन आणि प्रवर्तक हरजिंदर सिंग यांच्यावरून सर्व वाद सुरू झाला. या सर्व अफवांची सुरुवात कशी झाली हे त्याला माहीत नाही.

हे उषा नाडकर्णींनाच जमू शकतं! अभिनेत्रीचे पैसे दिले नाहीत, काढला उपाय

जुबिन नौटियाल यांच्या गळतीचे दुखणे

गायकाने मुलाखतीत सांगितले की, या सगळ्याचा त्याच्या आईवर खोल परिणाम झाला. ती डिप्रेशनमध्ये गेली. पेड ट्विटर थ्रेडवरून ही बातमी तयार केल्याचा आरोप झुबिनने केला. याबाबत त्याला कोणीही विचारण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर त्याला राष्ट्रविरोधी लेबल लावण्यात आलं.

जुबिन नौटियाल याने दिलं जशास तसं उत्तर

जुबिनने ट्वीट करत लिहिलं की, 'नमस्कार मित्र आणि ट्विटर कुटुंब. मी पुढील महिन्यात शूटिंगमध्ये व्यग्र असेन. सर्वांना विनंती आहे की, या अफवांनी विचलित होऊ नये. मला माझ्या देशावर प्रेम आहे आणि तुम्हा सर्वांवरही.'
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज