अ‍ॅपशहर

सोनू सूदने सांगितलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबवण्याचं कारण

देशात करोना व्हायरसबद्दल बोललं जातं तेवढंच आज सोनू सूदच्या मदत कार्याबद्दलही बोललं जात आहे. सोनूच्या प्रत्येक कामावर देशभरातील लोकांच्या नजरा आहेत. त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2020, 9:15 am
मुंबई- महाराष्ट्रातील स्थलांतरीत मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूदला काल वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवेश नाकारण्यात आल्याचं वृत्त प्रवेश नाकारण्यात आल्यामुळं त्यानं तिथून परतण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली. आता सोनूने स्वतः याबद्दल ट्वीट त्याला रोखण्यात आलं नसल्याचं सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सोनू सूदने सांगितलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर थांबवण्याचं कारण


बॉडीगार्डला दीपिका मानते भाऊ, पगार आहे लाखात

सोनूने ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मला स्थानकात प्रवेश नाकारला गेला नाही. मी सर्व नियमांचा पूर्णपणे आदर आणि पालन करतो. श्रमिकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यासाठी मी राज्य सरकारकडे ट्रेनने त्यांना पाठवण्यासंबधी विनंती केली होती.' नियमांमुळे त्याला आत जाता आलं नसल्याचं सांगितलं. याउलट सोशल मीडियावर सोनूची वेगळीच प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. सुरुवातीला सोनूला मुंबई पोलिसांनी अडवल्याच्या चर्चा होत्या. ही चर्चा एवढी वाढली की स्वतः सोनूने त्याला मुंबई पोलिसांनी नाही तर रेल्वे पोलिसांनी अडवल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं.


सोनू सूद त्याच्या मदतकार्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एका लेखातून सोनूच्या हेतूवर शंका उपस्थित करून त्याच्यावर टीका केल्यानं मोठाच वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सोनू सूद याची पाठराखणही केली. भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सोनूच्या कामाचं कौतुक करत संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली होती.

खऱ्या तलवारीने कापलं होतं शूपर्णकाचं नाक

सोनूनं या टीकेवर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आमच्यात कुठलेही गैरसमज नसल्याचं सांगत त्यानं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणानं सोनू सूद चर्चेत येत आहे.



दरम्यान, संजय राऊतांच्या विधानावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली. 'मी कोणासाठी म्हणून काही करत नाहीये. मला फक्त श्रमिकांसाठी काहीतरी करायचं होतं. संजय राऊत फार चांगले आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबतची चर्चाही चांगली झाली. माझं राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. एक अभिनेता म्हणून मी माझ्या कामात आनंदी आहे. सध्या माझ्याकडे करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज