अ‍ॅपशहर

Sonu Sood: चाहतीने केली सोनू सूदकडे विचित्र मागणी, अभिनेता म्हणाला- 'वाटलं नव्हतं हेही करावं लागेल'

Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूडला ट्विटरवर एक विचित्र मागणी आली. एका चाहत्याने त्याला वीज मीटर बसवण्याची मागणी केली. त्यानंतर सोनूने सूडने मजेशीर उत्तर दिले आणि त्या फॅनची मदत पण केली.

guest Arpita-Deo | Lipi 20 Jan 2022, 8:36 am
मुंबई- करोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा लॉकडाउन लागले होते तेव्हा अनेक लोकांना त्यांच्या मुळगावी पाठवण्याचे काम बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केलं. एवढंच नाही तर त्याने हजारो गरजूंना आवश्यक ती आर्थिक मदत केली, अनेकांना नोकरी मिळवून देण्याचाही प्रयत्न केला. दुसऱ्या लाटेत ही लोकांनी त्याला ट्वीट करून त्यांची व्यथा सांगितली आणि सोनू त्यांच्या मदतीसाठी धावून आला. शेकडो लोकांना ऑक्सिजन मिळवून देण्यापासून ते इस्पितळात तातडीने उपचार देण्यापर्यंतची सर्व मदत सोनूने केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonu sood replies fan asked him to help with electric meter
Sonu Sood: चाहतीने केली सोनू सूदकडे विचित्र मागणी, अभिनेता म्हणाला- 'वाटलं नव्हतं हेही करावं लागेल'


किस्सा- मन्नतमध्ये घुसला चाहता, पण बादशाहाला भेटलाच नाही

दरम्यान, त्याला अजूनही विविध प्रकारच्या मदतीसाठी ट्वीट येत आहेत. अलीकडेच सोनूला ट्विटरवर एक विचित्र मागणी आली. एका चाहतीने त्याच्याकडे विजेचा मीटर बसवण्याची मागणी केली. सोनूने या फॅनची मदत तर केलीच मात्र त्याला मजेशीर उत्तरदेखील दिले.


प्रिया दुबे नावाच्या एका ट्विटर युजरने सोनूला एक भन्नाट प्रश्न विचारला. तिने ट्वीटमध्ये लिहिले की, 'सर माझ्या वीज मीटरच्या डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे माझे वीज बिल १२०० रुपये येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे, मात्र त्यांच्याकडे मीटर नाही म्हणून त्यांनी माझा मीटर बदलला नाही. कृपया मदत करावी.'


सोनूने प्रियाला उत्तर देताना लिहिले की, 'एक दिवस मला वीज मीटरदेखील बसवावे लागेल याची कल्पनाही केली नव्हती.' नंतर सोनूने ट्वीटरवर एक स्क्रीन शॉट शेअर केला ज्यात त्याने मुलीची मागणी पूर्ण झाल्याचं सांगतलं. त्याने हे ट्वीट शेअर करत लिहिले, 'आज तुम्ही माझ्यासाठी नवीन वीज मीटर देखील मिळवून दिला.'

२६ वर्षांची साथ सुटली- वरुण धवनच्या ड्रायवरचे निधन

सोनू सूदच्या अनेक चाहत्यांनीही या ट्वीटवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, 'मी वीजेचं बिल भरायला विसरलो.' प्रियाने देखील तिची मदत केल्याबद्दल सोनू सूदचे आभार मानत लिहिले, 'सर, गेल्या दोन महिन्यांपासून मी कार्यालयाच्या फेऱ्या मारत होते पण आज तुमच्या मदतीने मला माझे नवीन मीटर मिळाले. तुम्ही माझे खरे हिरो आहात.'



दरम्यान करोनाची तिसरी लाट वाढत असताना सोनू सूदने लोकांना सांगितले होते की तो पुन्हा एकदा लोकांना मदत करण्यास तयार आहे. परंतु असं असलं तरी सोनू असंही म्हणाला होता की देव न करो कोणालाही त्याची मदत घ्यावी लागो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज