अ‍ॅपशहर

सुशांतसिंह राजपूतच्या घरी आक्रोश, वडिलांची तब्येत बिघडली

दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारा गुणी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सदैव हसतमुख चेहऱ्याने वावरणाऱ्या अभिनेत्याच्या अशा दुर्दैवी शेवटाने सगळ्यांनाच हादरा बसला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2020, 9:39 pm
पटणा- Sushant Singh Rajput Sucide प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. सुशांत असं काही पाऊल उचलेलं याचा कोणी विचारही केला नव्हता. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यग्रस्त होता. त्याच्या आत्महत्येचं कारण नैराश्य सांगितलं जात आहे. पण यात किती तथ्य आहे हे कोणालाही माहीत नाही. मुलाच्या निधनाची वार्ता वडिलांना कळता त्यांची तब्येत खालावली. ते कोणाशीही बोलत नाहीयेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सुशांतसिंहच्या वडिलांची तब्येत बिघडली


सुशांतसिंह राजपूतच्या घरी 'त्या' अखेरच्या क्षणी नक्की काय घडलं?

कोणाशीही बोलत नाहीयेत सुशांतचे वडील-

मुलगा जाण्याचा एवढा मोठा धक्का सुशांतच्या वडिलांना बसला आहे की ते कोणाशीही बोलत नाहीयेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचे कुटुंबिय मुंबईला यायला निघाले आहेत. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे ते आज मुंबईत येणार नाहीत. मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील असं म्हटलं जात आहे. कुटुंबाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. रिपोर्टनुसार, सुशांतसिंहचे वडील उद्या सकाळी ११ वाजता विमानाने मुंबईत येतील. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आणि सुशांतचा चुलत भाऊ नीरज बबलूही येईल.


Sushant Singh Rajput एका मुलीमुळे होता चिंतेत, घरच्यांनी केला आरोप

तीन- चार दिवसांपूर्वी सुशांतने केला होता वडिलांना फोन-

पटना येथील राजीव नगर येथे राहणाऱ्या सुशांतच्या घरी काम करणाऱ्या लक्ष्मीने सांगितले की, साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी सुशांतने घरी फोन केला होता. सुशांत फोनवर म्हणाला की, मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत आहेत. वडिलांची काळजी घे आणि घराबाहेर पडू नका.

सुशांत सिंह राजपूतची शेवटची पोस्ट, आईची येत होती आठवण

पंख्याला फास लटकवून केली आत्महत्या-

सुशांतच्या घरी त्याचे काही जवळचे मित्र आले होते. मित्रांसोबत असताना तो अचानक स्वतःच्या खोलीत गेला. थोड्यावेळाने मित्रांनी त्याला आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. सतत आवाज देऊनही सुशांत उत्तर दिलं नाही. यानंतर मित्रांनी बाहेरून त्याला फोन करायला सुरुवात केली. पण त्याने फोनही उचलला नाही. अखेर मित्रांनी दरवाजा तोडला. मात्र त्याआधीच सुशांतने गळफास लावून घेतला होता. यानंतर त्याच्या घरातील नोकराने पोलिसांना फोन करत यासंबंधी माहिती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज