अ‍ॅपशहर

सिनेमापेक्षा कलाकार मोठा नसतो: तापसी पन्नू

: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशभर राजकारण तापले असताना, दुसरीकडे या कायद्याविरोधी आंदोलनांमुळं सामान्य जनतेलाही हिंसाचाराचे चटके बसू लागले आहेत. समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2020, 7:19 pm
मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशभर राजकारण तापले असताना, दुसरीकडे या कायद्याविरोधी आंदोलनांमुळं सामान्य जनतेलाही हिंसाचाराचे चटके बसू लागले आहेत. समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनाही या कायद्याच्या समर्थकांनी धारेवर धरले आहे. सिनेसृष्टीतील जे कलाकार 'सीएए'ला विरोध दर्शवत आहेत,त्यांचा सिनेमा बॅायकॅाट केला जात आहे.बॅालिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी सिनेमा 'थप्पड'ला आता नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विरोध दर्शवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम taapsi pannu


नेटकऱ्यांच्या या भूमिकेवर तापसी पन्नूने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.एका सिनेमापेक्षा कलाकार मोठा नसतो. कलाकारामुळं सिनेमाला बॅायकॅाट करणं, हे मूर्खपणाचं लक्षण आहे.असे मत तापसीनं एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'थप्पड' सिनेमाला नेटकरी विरोध दर्शवत आहेत.तापसी पन्नू जसं सिनेमांमध्ये आक्रमक भूमिका साकारते, तसचं ती तिच्या खासगी आयुष्यातही बेधडक वक्तव्य करत असते. कलाकारांच्या खासगी वक्तव्यांमुळं त्यांच्या व्यावसायीक कामावर अशा गोष्टींचा परिणाम होता कामा नये.असं स्पष्ट मत तिनं मीडियाशी बोलताना व्यक्त केलं आहे.

सीरिया की दिल्ली? जावेद अख्तरांपासून स्वरा भास्करपर्यंत बॉलिवूडकरांची संतप्त प्रतिक्रिया
'एखादा हॅशटॅग ट्रेंड होण्यासाठी हजारो ट्विट्स करावे लागतात. मात्र इतक्या ट्विस्टमुळं चित्रपटावर काही वाईट परिणाम होतो असं मला वाटत नाही. माझी राजकीय किंवा सामाजिक मते वेगळी असू शकतात. पण याचा अर्थ असा होत नाही की, लोकांनी माझे सिनेमेच पाहायचे नाहीत. हे मला मूर्खपणाचं वाटतं. एक सिनेमा बनवण्यसाठी हजारो कलाकार काम करत असतात. त्यांचं कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं माझ्यामुळं सिनेमा बॉयकॉट करणं चूकीचं आहे. सिनेमापेक्षा कलाकार कधीच मोठा ठरत नाही', असं तापसी म्हणाली.
बिग बॉससाठी नवरा परवानगी देणार नाही- अमृता खानविलकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज