अ‍ॅपशहर

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं निधन, आईसोबत गेला होता मक्काला

शारुक कपूर याचं सोमवारी निधन झालं. तो २३ वर्षांचा होता. त्याला अनेक दिवस सर्दी होती. याशिवाय तो फार अशक्तही होता. मीडिया रिपोर्टनुसार, शारुक त्याच्या आईसोबत शकीला कपूर यांच्यासोबत मक्काला गेला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2020, 11:53 am
मुंबई- तमिळ फिल्ममेकर राज कपूर यांचा मुलगा शारुक कपूर याचं सोमवारी निधन झालं. तो २३ वर्षांचा होता. त्याला अनेक दिवस सर्दी होती. याशिवाय तो फार अशक्तही होता. मीडिया रिपोर्टनुसार, शारुक त्याच्या आईसोबत शकीला कपूर यांच्यासोबत मक्काला गेला होता. तिथेच त्याचं निधन झालं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharook


नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गायिकेची आत्महत्या

मुलाला सिनेसृष्टीत आणण्याची इच्छा होती

शारुकचा मृतदेह मक्कावरून चेन्नईत आणला जात आहे. फिल्ममेकर राज कपूर यांना मुलाला सिनेमांमध्ये आणण्याची इच्छा होती. शारुक कपूरचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तो या झगमगत्या दुनियेत पदार्पण करणार होता. मात्र शारुक कपूरच्या निधनाने सध्या सिनेसृष्टीत दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

...म्हणून बिग बींनी आठवडाभर तोंड धुतलं नाही

राज कपूर यांचं करिअर

फिल्ममेकर राज कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात तमिळ सिनेसृष्टीतून केली. त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सीवी श्रीधर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राज यांनी कामाची सुरुवात केली. यानंतर राज कपूर स्वतः दिग्दर्शक झाले आणि त्याने अनेक सिनेमे दिग्दर्शित केले. त्यांनी २००८ मध्ये शेवटचा तमिळ सिनेमा दिग्दर्शित केला होता. याशिवाय राज कपूर यांनी तमिळ टीव्ही वाहिनींवरील काही मालिकांमध्येही काम केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज