अ‍ॅपशहर

Taslima Nasreen on Surrogacy: आयती मुलं हवी! सरोगसीने पालक होणाऱ्यांवर तस्लिमा नसरीन यांनी साधला निशाणा

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सरोगसीबाबत वक्तव्य केलं आहे. जिथे एकीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीच्या माध्यमातून आई- बाबा झाले तिथेच तस्लिमा यांनी अशा पालकांवर निशाणा साधला.

guest Arpita-Deo | Lipi 24 Jan 2022, 10:43 am
मुंबई- प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतच त्यांनी सरोगेसी बाबत एक विधान केलं आहे जे चांगलच गाजत आहे. तस्लिमा यांनी सरोगेसीबद्दल एक ट्वीट केलं. त्यांच्या या ट्वीटमध्ये सरोगेसीद्वारे आई-बाबा झालेल्या जोडप्यांवर निशाना साधण्यात आला आहे. अलीकडे, लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीद्वारे आई-बाबा झाले. त्यांनी एका लहान मुलीला जन्म दिला. त्यानंतर तस्लिमा यांनी हे ट्वीट केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले. काहींनी तस्लिमा यांच्या मताशी सहमती दाखवली तर काहींनी त्यांचा विरोध केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम taslima nasreen surrogacy statement priyanka chopra nick jonas
Taslima Nasreen on Surrogacy: आयती मुलं हवी! सरोगसीने पालक होणाऱ्यांवर तस्लिमा नसरीन यांनी साधला निशाणा


तर अशी दिसते वामिका, विराटला पाहताना कॅमेऱ्यात झाली कैद

तस्लिमा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'गरीब महिला असल्यामुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना नेहमीच त्यांच्या स्वार्थासाठी समाजात गरिबी लोकांची गरज असते. जर तुम्हाला एखादं मूल वाढवायचं असेल तर दत्तक घ्या. आपले संस्कार वंशाच्या मुलांनाच मिळायला हवेत हा अत्यंत स्वार्थी विचार आहे.'



'सरोगसीच्या माध्यमातून बाळाची आई होणाऱ्या महिलांना आई झाल्याची अनुभूती कशी येणार? मुलाला जन्म देताना जशी भावना एका आईची असते तशीच भावना त्यांनाही असेल का?', असा प्रश्न तस्लिमा यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये विचारला.


तिसऱ्या ट्वीटमध्ये तस्लिमा यांनी लिहिले, 'जोपर्यंत श्रीमंत महिला सरोगसीद्वारे आई बनत नाहीत तोपर्यंत मी सरोगसी स्वीकारणार नाही. जोपर्यंत पुरुष प्रेमाने बुरखा घालत नाही तोपर्यंत मी बुरखा स्वीकारणार नाही. जोपर्यंत पुरुष देहविक्रीचा तयार होत नाहीत आणि पुरुष महिला ग्राहकांची वाट पाहत नाहीत तोपर्यंत मी वेश्या व्यवसाय स्वीकारणार नाही. अन्यथा सरोगसी, बुरखा, देहविक्री हे फक्त महिला आणि गरीबांचे शोषण आहे, असं त्या म्हणाल्या. तस्लिमा यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Photos- बेडरूमपेक्षाही मोठं आहे मलायका अरोराचं वॉर्डरोब

View this post on Instagram A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीद्वारे पालक बनले आहेत

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी गेल्या शुक्रवारी सोशल मीडियावर जाहीर केलं की ते सरोगसीद्वारे आई-बाबा झाले. यासोबतच त्यांच्या प्रायव्हसीचा आदर केला जावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. प्रियांकाने ही आनंदाची बातमी दिल्यावर सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत अनेकांनी प्रियांका आणि निकला शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram A post shared by Priyanka (@priyankachopra)

हे बॉलिवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले

बॉलीवूडमधील अनेक कलाकार सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत. या यादीत शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, शाहरुख खान-गौरी, प्रीती झिंटा, करण जोहर, तुषार कपूरसह अनेकांनी पालक होण्यासाठी सरोगसीची मदत घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज