अ‍ॅपशहर

तेजश्री प्रधानच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

आपल्या पहिल्याच सिनेमात तेजश्रीने लिपलॉक सीन दिला आहे. आता तिचा हा बोल्ड अवतार तिच्या कट्टर चाहत्यांना कितपत आवडतो हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 1:23 pm
मुंबई: मालिका, नाटक आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान बॉलिवड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'बबलू बॅचलर' असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tejashree


आपल्या पहिल्याच सिनेमात तेजश्रीने लिपलॉक सीन दिला आहे. आता तिचा हा बोल्ड अवतार तिच्या कट्टर चाहत्यांना कितपत आवडतो हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. दरम्यान, स्वतः तेजश्रीने तिच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं. तेजश्रीच्या चाहत्यांनीही तिच्या नवीन प्रवासासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. इथे पाहा ट्रेलरः


तेजश्री आणि शर्मननं यापूर्वी हिंदी नाटकात एकत्र काम केलं आहे. त्यांची जोडी सिनेमाच्या पडद्यावर दिसेल. सिनेमाचं दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केलं आहे. 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतून सध्या तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती साकारत असलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.

४० व्या वर्षी अभिनेत्रीने केलं पुन्हा लग्न!

'अग्गबाई सासूबाई' वेगळ्या वळणावर
'अग्गबाई सासूबाई' या मालिकेची सध्या घराघरांत चर्चा आहे. आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या लग्नानंतर मालिका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. आसावरी- अभिजीत राजेंचा संसाराला सुरुवात होत आहे तर, एकीकडे सोहम आणि शुभ्राचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. सोहमच्या हट्टी व स्वार्थी स्वभाव शुभ्रासमोर आल्यानं ती सोहम पासून वेगळं होण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

'होणार सून मी या घरची' या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी नावाच्या सोशिक व समंजस तरुणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळं ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय, महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही तिनं केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज