अ‍ॅपशहर

Vicky Kaushal Video: जसं दिसतं तसं असतंच असं नाही.. सलमानच्या व्हिडिओवर अखेर बोलला विकी कौशल

Vicky Kaushal Video: विकी कौशल सध्या सलमान खानसोबतच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांना वाटले की सलमानने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वागवले. मात्र आता या संपूर्ण घटनेवर विकीची प्रतिक्रिया आली आहे.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2023, 11:36 am
अबुधाबी- अलीकडेच अबुधाबीमध्ये आयफा पुरस्कार २०२३ ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमातील सलमान खान आणि विकी कौशल चा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तो पाहिल्यानंतर सलमानने जाणीवपूर्वक विकीकडे दुर्लक्ष केले असे लोकांना वाटले. एवढेच नाही तर सलमानच्या सुरक्षा रक्षकाने विकीला धक्काबुक्कीही केल्याचं यात दिसतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salman vicky new video


दिग्दर्शकासोबत नाना पाटेकरांचं भांडण अन् मुलगा हिरो झालाच नाही, सध्या काय करतो मल्हार?
या सगळ्यात सलमानचे कट्टर चाहते त्याच्या समर्थनात उतरले होते. 'वाघ आला की रस्ता मोकळा करावाच लागतो, मग तो कोणीही असो' अशाप्रकारच्या कमेन्ट त्यांनी लिहिल्या होत्या. या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असताना आता विकीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तो म्हणाला, 'कधी कधी गोष्टी अशाच वाढत जातात.' तो अजून काय म्हणाला तेही जाणून घेऊ.

This is how Salman Khan, Abhishek Bachchan, Vicky Kaushal kick-started IIFA 2023


याविषयी बोलताना विकी कौशलने आयफा रॉक्स सेरेमनीच्या ग्रीन कार्पेटवर वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, 'अनेकदा अनेक गोष्टी उगाच वाढवल्या जातात. सध्या उगाचच्या चर्चा होत आहेत. तसेच जसं व्हिडिओमध्ये दिसतं तशाच गोष्टी असतात असं नाही. त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.'


नंतर आयफाच्या ग्रीन कार्पेटवर, सलमान खान स्वतः विकी कौशलकडे गेला आणि त्याला मिठी मारली आणि सर्व अफवांवर पूर्णविराम दिला. विकी शनिवारी अभिषेक बच्चनसोबत आयफा अवॉर्ड पुरस्कार सोहळा होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे.


सारासोबत विकीचा येत आहे सिनेमा

विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्याचा सारा अली खानसोबतचा 'जरा हटके जरा बचके' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हा सिनेमा येत्या २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज