अ‍ॅपशहर

विक्रम गोखले यांची प्रकृती अतिशय चिंताजनक , नवीन हेल्थ अपडेट आले समोर

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल अपडेट आलं असून अद्यापही त्यांची प्रकृती खालावलेलीच असल्याचं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2022, 8:17 pm
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याचं वृत्त आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikram gokhale health condition


मिळालेल्या माहितीनुसार उपचांराना प्रतिसाद देत नसल्यानंविक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची प्रकृती अद्याही चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.

१५ दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखालीगेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आज सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणं थांबवल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता अतिशय चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

महत्वाचे लेख