अ‍ॅपशहर

प्रत्येक ठिकाणी हे स्पायडर प्लांट सोबत घेऊन का फिरतो जॅकी श्रॉफ; मजेशीर आहे झाडाची कथा

Jackie Shroff With Spyder Plant बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ सुभाष घई यांच्या वाढदिवसालादेखील एक छोटंसं रोप सोबत घेऊन आला होता. आता त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 3:51 pm
मुंबई- सुभाष घई यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला सलमान खानपासून ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, कार्तिक आर्यन आणि अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत जॅकी श्रॉफही पोहोचला होता. जॅकी श्रॉफचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या हातात स्पायडर प्लांट धरून उभा आहे. आता हे झाड जॅकीच्या हातात का आहे? हे रोप त्याने सुभाष घई यांना भेट दिलं का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, जॅकी काही पहिल्यांदाच अशा प्लांट्ससोबत पार्टीत दिसला नाहीये. याआधी जॅकी गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिच्या पार्टीत प्लांटसोबत दिसला होता. खरं तर, झाड आणि जॅकीची कथा फार जुनी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jacky shroff


View this post on Instagram A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जॅकीच्या गळ्यात वनस्पतीच्या माळा देखील दिसल्या आहेत. जॅकी मानतो की झाडे लावणे हा पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जॅकी त्याच्या गळ्यात एक लहान रोप असलेलं भांड लटकवून फिरतानाही मागेपुढे पाहत नाही. जॅकीला स्पायडर प्लांट खूप आवडतो. जॅकीच्या मते विषारी हवा टाळण्यासाठी कारमध्ये हे रोप ठेवलं पाहिजे. यासगळ्यामागचं कारणही जॅकीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. जॅकी म्हणालेला, लहानपणी मी मेथीचं झाड लावलं होतं. जेव्हा ते मोठं झालं तेव्हा मला वाटलं की मी एकाला जीवन दिलं.तेव्हापासून माझ्या डोक्यात हे पक्क बसलं की आपल्याला बिया लावायलाच हव्या.' आणखी एका मुलाखतीत तो म्हणालेला, 'मी झाडे लावून जगावर कोणतेही उपकार केले नाहीत. हे प्रत्येकाचं काम आहे. नसतील लावायची झाडं तर जळून मरावं लागेल. तेच होणार आहे.'
View this post on Instagram A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

जॅकी पुढे म्हणालेला, 'तुम्हाला तुमच्या मुलाच्या मुलाचा विचार करण्याची गरज आहे. माझी अर्धी हाडं मसनात गेली. पण पुढे इतरही येतील, आपल्याचं घरातले लोक आहेत. माझा टायगर आहे, माझ्या टायगरला छोटा टायगर असेल. तुमचाही येईल. त्यांच्यासाठी आपल्याला हे करायलाच हवं.' त्यामुळेच जॅकी कित्येक वर्ष अनेक ठिकाणी या स्पायडर प्लांटसोबत फिरताना दिसतो.

महत्वाचे लेख