अ‍ॅपशहर

नामांकन आणि पुरस्कारांचा पाऊस; आणखी एका मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी

ऑक्टोबर उजाडला तरी मुंबई-महाराष्ट्रात पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नाहीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2020, 6:48 pm
मुंबई :ऑक्टोबर उजाडला तरी मुंबई-महाराष्ट्रात पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नाहीय. मुंबईत रोज संध्याकाळी हमखास पाऊस पडतोच. पण, असाच पाऊस आता टोकियोमध्येही बरसणार आहे. तुम्ही म्हणाल, मध्येच टोकियोच्या पावसाचं काय? तर त्याला एक कारण आहे. 'येरे येरे पावसा' या मराठी चित्रपटावर 'सहाव्या टॉप इंडी फिल्म अॅवॉर्ड टोकियो, जपान' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकनाचा व पुरस्कारांचा आनंददायी वर्षाव झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मराठी चित्रपट
मराठी चित्रपटमराठी चित्रपट


सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना या वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन मिळवत सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या विभागातल्या पुरस्कारांवर 'येरे येरे पावसा' या चित्रपटानं आपलं नाव कोरले आहे. 'यंदाच्या पावसानं साऱ्यांनाच सुखावलं आहे. या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्यानं आम्हीही या आनंदात चिंब झालो आहोत', असं दिग्दर्शक शफक खान सांगतात.
चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम. कोळी यांनी सांभाळली असून, संकलन चंदन अरोरा यांनी केलं आहे. कथा भूषण दळवी, तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. या संपूर्ण टीमचं सध्या जपानमध्ये कौतुक होतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज