अ‍ॅपशहर

शाहरूखकडे वितरकांचा पैशासाठी तगादा

माणूस कितीही मोठा असो त्याचे ग्रह फिरले तर भलेभले त्याला सोडून जातात. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानबाबत काहीसे असेच घडत आहे. शाहरूखचा 'जब हैरी मेट सेजल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याने वितरकांनी त्याच्याकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून तगादा लावला आहे. बरं हे वितरक निव्वळ पैसे मागून थांबले नाहीत, तर काही वितरकांनी शाहरूखला मेसेज करून सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

Maharashtra Times 17 Aug 2017, 10:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jab harry met sejal big setback for shah rukh khan and now distributors want their money refunded
शाहरूखकडे वितरकांचा पैशासाठी तगादा

माणूस कितीही मोठा असो त्याचे ग्रह फिरले तर भलेभले त्याला सोडून जातात. बॉलिवूडचा किंग शाहरूख खानबाबत काहीसे असेच घडत आहे. शाहरूखचा 'जब हैरी मेट सेजल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याने वितरकांनी त्याच्याकडे नुकसानभरपाई मिळावी म्हणून तगादा लावला आहे. बरं हे वितरक निव्वळ पैसे मागून थांबले नाहीत, तर काही वितरकांनी शाहरूखला मेसेज करून सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

काही महिन्यापूर्वी सलमान खानचा 'ट्यूबलाइट' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर सलमानने नुकसान भरपाई म्हणून वितरकांना ३२ कोटी रूपये दिले होते. त्यामुळे शाहरूखनेही 'जब हैरी मेट सेजल' फ्लॉप झाल्याने आपल्याला नुकसान भरपाई द्यावी असा वितरकांचा आग्रह आहे.

विशेष म्हणजे शाहरूखने या सिनेमाचे सॅटेलाईट, संगीत आणि डिजिटल हक्क विकून भरघोस कमाई केली आहे. यापूर्वी शाहरूखचा 'दिलवाले' हा सिनेमा फ्लॉप झाला होता. तेंव्हा त्याने वितरकांना नुकसान भरपाई म्हणून २५ कोटी रूपये दिले होते. 'अशोका' आणि 'पहेली' च्या अपयशानंतरही शाहरूखने वितरकांना नुकसान भरपाई दिली होती, त्यामुळे वितरकांनी पुन्हा एकदा नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याच्याकडे तगादा लावला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज