अ‍ॅपशहर

आणि हा तरुण अभिनेता बनला ३२४ वर्षांचा वृद्ध!

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अभिनेत्री कृती सेनन यांच्या 'राबता' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच दाखविण्यात आला. यात ३२४ वर्षांच्या वृद्धाची व्यक्तिरेखा साकारणारा ३२ वर्षीय तरुण अभिनेता कोण, हे मात्र कोणालाच ओळखता आलेलं नाही...

Maharashtra Times 22 Apr 2017, 12:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajkumar raos new look in sushatsingh rajput kriti senan starer raabta cinema
आणि हा तरुण अभिनेता बनला ३२४ वर्षांचा वृद्ध!


या म्हाताऱ्याचा फोटो पाहिलात? हा म्हातारा थोडा-थोडका नव्हे, तब्बल ३२४ वर्षांचा आहे. पण सिनेमात! प्रत्यक्षात तो अवघा ३२ वर्षांचा तरुण आहे. चकीत झालात ना? पण हे खरं आहे. ही आधुनिक जमान्यातील मेकअपची किमया आहे. मेकअपच्या या जादूनं तिशीतल्या तरुणाला थेट ३२४ वर्षांचं बनवून टाकलं आहे. विशेष म्हणजे, या तरुणानं स्वत:हून आपली ओळख उघड करेपर्यंत भल्या-भल्यांना ते माहीत नव्हतं..

राजकुमार राव असं या गुणी अभिनेत्याचं नाव आहे. आगामी 'राबता' सिनेमात राजकुमारनं या जख्ख म्हाताऱ्याची भूमिका साकारली आहे. 'क्वीन' आणि 'ट्रॅप्ड' या सिनेमांमधील दमदार अभिनयानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर तो या हटके भूमिकेत दिसणार आहे. सुशांतसिंग राजपूत व कृती सेनन यांच्या अभिनयापेक्षा राव याच्या या लूकचीच सध्या बॉलिवूडमध्ये अधिक चर्चा आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर दाखविण्यात आला. त्यावेळी त्याला कोणी ओळखलंच नाही. त्यानं स्वत: ट्विट करून हा रहस्यभेद केला.



प्रोस्थेटिक मेकअपच्या सहाय्यानं त्याचा चेहरा आरपार बदलण्यात आला आहे. या व्यक्तिरेखेसाठी 'फायनल लूक' निवडण्यापूर्वी जवळपास १६ प्रकारच्या मेकअप लूक टेस्ट कराव्या लागल्या. खास लॉस एंजलिसहून रंगभूषाकारांची टीम बोलावण्यात आली होती. याविषयी बोलताना दिग्दर्शक दिनेश विजान म्हणाले, 'ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला मेकअपसाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. ३२ वर्षांच्या राजकुमारला ३२४ वर्षांचा वृद्ध दाखवणं अतिशय अवघड होतं. पण त्यानं तं केलं. दिसण्याप्रमाणंच वृद्ध व्यक्तीचा आवाजही हुबेहूब यावा यासाठीही राजकुमारनं आवाजावर खूप मेहनत घेतली आहे.'
And here is my Guest appearance from #Raabta. pic.twitter.com/AZaHryWX6a — Rajkummar Rao (@RajkummarRao) April 21,     2017  राजकुमार सांगतो की, 'मेकअपसाठी मला ४-५ तास बसावं लागत होतं. या मेकअपमुळं मी घामानं अक्षरश: भिजून निघायचो. पण मी विचलित न होता माझ्या मनावर नियंत्रण ठेवलं. एका अभिनेत्यासाठी हीदेखील एक मजेशीर गोष्ट असते. शिवाय दिग्दर्शक म्हणून दिनेश विजान यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता. त्यांच्या मार्गदर्शनाचाही फायदा झाला.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज