अ‍ॅपशहर

'मोगली मॅजिक', १० दिवसांत १०० कोटींची कमाई

दोन दशकांपूर्वी छोट्या पडद्यावरून घराघरात आणि बच्चेकंपनीच्या मनात पोहोचलेल्या मोगलीची जादू आजही कायम असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळतंय. जॉन फेवरो दिग्दर्शित 'द जंगल बुक' या थ्रीडी अॅनिमेटेड सिनेमानं अवघ्या दहा दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे.

Maharashtra Times 19 Apr 2016, 3:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the jungle book crosses rs 100 crore mark
'मोगली मॅजिक', १० दिवसांत १०० कोटींची कमाई


दोन दशकांपूर्वी छोट्या पडद्यावरून घराघरात आणि बच्चेकंपनीच्या मनात पोहोचलेल्या मोगलीची जादू आजही कायम असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळतंय. जॉन फेवरो दिग्दर्शित 'द जंगल बुक' या थ्रीडी अॅनिमेटेड सिनेमानं अवघ्या दहा दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे. शाळांना सुट्या असल्यानं, दोन आठवड्यांनंतरही मोगलीला बघण्यासाठी आबालवृद्धांची रिघ लागली असून अनेक शो 'हाउसफुल्ल' होत आहेत.

'द जंगल बुक'बद्दल भारतात असलेली उत्कंठा लक्षात घेऊन, हा सिनेमा अमेरिकेआधी भारतात प्रदर्शित करण्यात आला होता. ८ एप्रिलला तो थिएटरमध्ये झळकला आणि अवघ्या चार दिवसांतच त्यानं ४८ कोटींचा गल्ला जमवला. मोगली, बगिरा, अकेला, शेरखान, भालूला भेटण्यासाठी बच्चेकंपनीपेक्षा त्यांचे पालकच अधिक आतूर होते. कारण, या सगळ्यांनी बालपणी त्यांचं मनोरंजन केलं होतं. त्यामुळे त्यांनी सहकुटुंब सहपरिवार मल्टिप्लेक्स गाठली आणि मोगलीच्या भेटीचा आनंद लुटला.

या शुक्रवारी किंग खान शाहरुखचा बहुचर्चित 'फॅन' प्रदर्शित झाल्यानं द जंगल बुकच्या बुकिंगवर परिणाम होईल, अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही. या सिनेमानं शुक्रवारी ८.०२ कोटी, शनिवारी ८.५१ कोटी, रविवारी १०.६७ कोटी आणि सोमवारी ५.०९ कोटींची कमाई केल्याचं समजतं. त्यामुळे सिनेमानं आत्तापर्यंत तब्बल १०१.८२ कोटी रुपये कमावले आहेत आणि हा सिलसिला आणखी एक-दोन आठवडे नक्की चालेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. हा सगळा मोगलीचा चमत्कार आहे, हे वेगळं सांगायला नको!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज