अ‍ॅपशहर

सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' परत पाठवला?

संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटावरून वादळ उठलेले असताना सेन्सॉर बोर्डाने काही तांत्रिक कारणे देत हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवल्याचे वृत्त असून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही निव्वळ अफवा असून चित्रपट १ डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Times 17 Nov 2017, 8:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम central board of film certification sent back padmavati to its makers due to technical resones
सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' परत पाठवला?

संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटावरून वादळ उठलेले असताना सेन्सॉर बोर्डाने काही तांत्रिक कारणे देत हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवल्याचे वृत्त असून या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही निव्वळ अफवा असून चित्रपट १ डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पद्मावती चित्रपट नव्याने सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर नियमांची मोजपट्टी लावून त्याचे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय दिला जाईल, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्सकडून हा चित्रपट प्रदर्शित केला जात असून या कंपनीचे मुख्य संचालन अधिकारी अजित अंधारे यांनी एक ट्विट करून यात कोणतंही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे, ही निव्वळ अफवा असल्याचे अंधारे यांनी नमूद केले आहे. तर पद्मावती चित्रपट ठरलेल्या मुहूर्तावर म्हणजेच १ डिसेंबर रोजीच प्रदर्शित होणार आहे, असे चित्रपटाच्या मार्केटिंग टीममधील सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज