अ‍ॅपशहर

ही 'ती' नव्हेच!

दीपिका पडुकोणला जर कुणी साखरपुड्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर? आश्चर्य वाटलं ना! अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तसं केलं खरं. पण त्यामुळे दीपिकाच्या चाहत्यांना धक्काच बसला.

Maharashtra Times 30 Apr 2016, 12:50 am
दीपिका पडुकोणला जर कुणी साखरपुड्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर? आश्चर्य वाटलं ना! अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तसं केलं खरं. पण त्यामुळे दीपिकाच्या चाहत्यांना धक्काच बसला. त्याचं झालं असं, की एका ट्विटमध्ये त्यांनी 'दीपिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद' असं लिहिलं होतं. त्यामुळे सगळ्यांना साहजिकच धक्का बसला. कुणालाही ती दीपिका पडुकोणच आहे असं वाटणं साहजिक होतं. पण ही ती दीपिका नव्हेच. ड्रीमगर्लनं तिला फॉलो करणाऱ्या कुठल्या तरी दीपिकाला या शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्यामुळे अनेक तास दीपिका हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज